२२ जानेवारीला केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांना अर्धा दिवसाची सुट्टी !

येत्या २२ जानेवारीला अयोध्येतील श्रीराममंदिराच्या उद्घाटनाच्या वेळी केंद्रीय कर्मचार्‍यांना अर्धा दिवसाची सुटी घोषित करण्यात आली आहे. याद्वारे ते मंदिराच्या उद्घाटनाचा थेट प्रक्षेपित होणारा सोहळा पाहू शकणार आहेत.

श्रीराममंदिराच्या उद्घाटनाला राज्यातून जाणार्‍या कुणालाही त्रास होणार नाही, याची काळजी घ्या ! – गृहमंत्री जी. परमेश्‍वर, कर्नाटक

श्रीराममंदिराच्या उद्घाटनासाठी जाणार्‍या राज्यातील कोणत्याही भक्ताला त्रास होणार नाही, कोणतीही अहितकारक  घटना घडणार नाही, याची काळजी घ्यावी, अशी सूचना राज्यातील सर्व पोलीस अधीक्षकांना गृहमंत्री जी. परमेश्‍वर यांनी दिली आहे.  

श्रीराममंदिराच्या गर्भगृहात श्रीरामाच्या मूर्तीची विधीवत स्थापना !

श्रीराममंदिराच्या गर्भगृहाच्या चौथर्‍यावर १८ जानेवारी या दिवशी श्रीरामाच्या मूर्तीची विधीवत स्थापना करण्यात आली. ४ तासांहून अधिक काळ पुरोहितांकडून मंत्रोच्चरात करण्यात आलेल्या पूजेद्वारे ही स्थापना करण्यात आली.

श्रीराममंदिरात घुमणार दक्षिण भारतात केलेल्या घंटांचा आवाज !

अयोध्येतील राममंदिरात १०८ घंटा बसवण्यात येणार असून तमिळनाडूतील नमक्कल जिल्ह्यातील ‘श्री अंदल मोल्डिंग वर्क्स’ला त्या घंटा बनवण्याची सूचना देण्यात आली होती.

राममंदिराच्या उद्घाटनात घातपात करण्याचा कट उघड

बाबरी पाडणार्‍या कारसेवकांवर टीका करणारे निधर्मीवादी राजकीय पक्ष श्रीराममंदिराच्या ठिकाणी घातपात करणार्‍या मुसलमान आतंकवाद्यांविषयी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !

पंतप्रधानांनी प्रसिद्ध केले श्रीराममंदिरावरील टपाल तिकीट !

अयोध्या येथे होणार्‍या प्रभु श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्‍वभूमीवर सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीराममंदिराच्या स्मरणार्थ टपाल तिकीट प्रसिद्ध केले आहे.

अयोध्येत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लावलेले स्वागतफलक ठरत आहेत लक्षवेधी !

श्रीराममंदिराचे उद्घाटन आणि श्री रामललाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा यांनिमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक ठिकाणी लावलेले  स्वागतफलक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.

(म्हणे) ‘मशीद तोडून मंदिर बांधणे स्वीकारता येणार नाही !’ – उदयनिधी स्टॅलिन

मंदिर पाडून मशीद बांधली, हे उदयनिधी यांना चालते का ? हे त्यांनी सांगायला हवे ! जर चालत नसेल, तर देशातील साडेतीन लाख मंदिरे पाडून तेथे मशिदी उभ्या राहिल्या आहेत, त्या रिकामी करण्यास ते सांगतील का ?

रामललाच्या आरतीला ‘ऑनलाईन’ उपस्थित रहाता येणार !

अयोध्येतील राममंदिरातील श्री रामललाच्या आरतीला उपस्थित रहाता यावे, यासाठी भाविकांच्या सेवेसाठी न्यासाच्या वतीने पाससाठी ‘ऑनलाईन’ अर्ज प्रक्रिया चालू केली आहे.

देशातील सर्व रेल्वे स्थानकांवर २२ जानेवारीला करण्यात येणार रोषणाई !

तसेच फुलांची सजावटही करण्यात येणार आहे.