अयोध्या येथील कार्यक्रमानिमित्त श्रीक्षेत्र चाफळ येथे भव्य सोहळ्याचे आयोजन !
२ जानेवारी या दिवशी पहाटे ४.४५ वाजता प्रभु श्रीरामाची काकड आरती होईल. नंतर सकाळी ८ वाजता भजन होईल. सकाळी १० वाजता रामरक्षास्तोत्र, मारुतिस्तोत्र आणि मनोबोध यांचे पठण होईल.
२ जानेवारी या दिवशी पहाटे ४.४५ वाजता प्रभु श्रीरामाची काकड आरती होईल. नंतर सकाळी ८ वाजता भजन होईल. सकाळी १० वाजता रामरक्षास्तोत्र, मारुतिस्तोत्र आणि मनोबोध यांचे पठण होईल.
अयोध्येतील रामजन्मभूमीवर प्रभु श्रीराम विराजमान होत आहेत, हा क्षण देशवासियांसाठी दीपोत्सवच आहे, असे प्रतिपादन केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान पालट राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी केले.
प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने पुणेकरांना अयोध्येतील रामललाच्या दर्शनाचे निमंत्रण देण्यासाठी न्यासाच्या वतीने एकूण ३५ सहस्र ३८२ रामसेवकांनी सहभाग घेतला. त्यात १० सहस्र १७८ महिलांचा सहभाग आहे.
२२ जानेवारीला अयोध्येत श्रीराममंदिरातील रामललाची पूजा करण्याचा मान देशातील ११ दांपत्यांना मिळाला आहे. त्यांपैकी एक नवी मुंबईतील कांबळे दांपत्य आहे.
२२ जानेवारी या दिवशी अयोध्या येथे श्रीरामजन्मभूमीत होणार्या श्रीरामामूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापन सोहळ्याला लेकाराम सैनी उपस्थित रहाणार आहेत.
या घटनेविषयी काँग्रेस, समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस आदी तथाकथित निधर्मीवादी राजकीय पक्ष तोंड उघडणार नाहीत, हे लक्षात घ्या !
श्रीराममंदिरातील श्रीरामललाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या सोहळ्यासाठी ८ ते १० सहस्र मान्यवरांना निमंत्रण देण्यात आले आहे.
१९ जानेवारीच्या संध्याकाळी ७ वाजल्यापासून श्रीरामजन्मभूमीवरील तात्पुरत्या स्वरूपात असणार्या श्रीराममंदिरात दर्शन घेता येणार नाही. प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या सिद्धतेमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
अयोध्यानगरीमध्ये २२ जानेवारी या दिवशी होत असलेल्या श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी मंदिराचा संपूर्ण परिसर झेंडूच्या फुलांनी आकर्षकरित्या सजवण्यात आला आहे. मंदिराकडे जाणार्या मुख्य मार्गापासून ते मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत असलेल्या भिंतींवर झेंडूच्या फुलांच्या माळा लावण्यात आल्या आहेत.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ संत आहेत, तर आपले पंतप्रधान संन्यासी प्रवृत्तीचे आहेत. त्यामुळे येथे येणार्या भाविकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. अशी माहिती येथील भाजपचे आमदार श्री. विनीत सिंह यांनी येथे दैनिक ‘सनातन प्रभात’च्या विशेष प्रतिनिधीशी बोलतांना दिली.