
राजगड (मध्यप्रदेश) – येथे सायकलद्वारे अयोध्येला जाणार्या रामभक्तांना बॉबद्वारे उडवून देण्याची धमकी देणार्या असगर खान आणि रामभक्तांना शिवीगाळ करणारा असगर खान याचा मुलगा यांना पोलिसांनी अटक केली आहे. नील पटेल आणि देव पटेल गुजरातमधून अयोध्येला जात असतांना मध्यप्रदेशातील राजगडच्या सारंगपूर येथे पोचले असता ही घटना घडली.
सारंगपूर येथे नील आणि देव पटेल पोचले असता त्यांच्या जवळ लोक गोळा झाली. त्यांनी या दोघांना ‘तुम्ही कुठे जात आहात ?’, असे विचारले. त्यावर पटेल यांनी अयोध्येला जात असल्याचे सांगितले. त्या वेळी येथे उपस्थित असगर खान याने दोघांना, ‘तुम्ही अयोध्येपर्यंत पोचू शकत नाही; कारण तुम्हाला बाँबने उडवून देणार आहोत’, अशी धमकी दिली. या घटनेचा व्हिडिओ अन्य एका व्यक्तीने बनवला. या वेळी खान याच्या मुलाने नील आणि देव पटेल यांना शिवीगाळ केली. या धमकीमुळे पटेल यांनी पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी असगर खान आणि त्याच्या मुलगा यांना अटक केली.
(सौजन्य : MHARO RAJGARH)
संपादकीय भूमिका
|
मडिकेरी (कर्नाटक) येथे मंदिराच्या परिसरात कबर : हिंदूंकडून निषेध
Paris Knife Attack : फ्रान्स : मुसलमानाकडून गर्भवती महिलेसह तिघींवर चाकूद्वारे आक्रमण
देहली आंदोलनावरून संसदेचे कामकाज स्थगित
देहलीतील आंदोलनात ९८९ गुन्हेगारांचा समावेश ! – Delhi Police
केपे येथील नागरिकांची भूमी व्यवहारामध्ये ५६ लाखांची फसवणूक
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद