नवी मुंबई – २२ जानेवारीला अयोध्येत श्रीराममंदिरातील रामललाची पूजा करण्याचा मान देशातील ११ दांपत्यांना मिळाला आहे. त्यांपैकी एक नवी मुंबईतील कांबळे दांपत्य आहे. श्री. विठ्ठल कांबळे आणि सौ. उज्ज्वला कांबळे यांना या पूजेसाठी १५ ते २२ जानेवारीपर्यंत कडक ४५ नियमांचे पालन करावे लागणार आहे. यात वस्त्रपरिधान ते जेवणापर्यंतच्या नियमांचा सामावेश आहे.
श्री. विठ्ठल कांबळे हे चेंबूर एज्युकेशन सोसायटीच्या प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक असून आई-वडिलांमुळे घरात वारकरी संप्रदाय असल्याने अयोध्येच्या निमंत्रणाने त्यांच्या कुटुंबाला आनंदाचे अश्रू अनावर झाले. रा.स्व. संघाचे स्वयंसेवक असलेले कांबळे वर्ष १९९२ च्या कारसेवेत सहभागी होते. बाबरीचा ढाचा पडतांना त्यांनी पाहिला होता.