
पणजी, १५ डिसेंबर (वार्ता.) – देहली येथील लाडो सराय या भागातील सायरो-मलाबार चर्चचे व्यवस्थापन चालवत असलेले ‘लिटल फ्लॉवर चर्च’ देहली विकास प्राधीकरणाने अनधिकृत ठरवून हल्लीच पाडली होती. या घटनेची नोंद घेऊन देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ‘लिटल फ्लॉवर चर्च’ला प्रार्थनेसाठी तात्पुरती भूमी पुरवली आहे. या भूमीत आता चर्चचे व्यवस्थापन नाताळ साजरा करणार आहे. या प्रकरणी त्वरित हे साहाय्य केल्याने चर्चचे आर्चबिशप भरणीकुलंगारा यांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांचे आभार मानले आहेत. (भारतात हिंदूंची अनेक मंदिरे पाडण्यात आली आहेत; मात्र त्या वेळी ‘आप’ने हिंदूंना कोणते साहाय्य केले ? – संपादक)
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
कर्नाटक : न्यायाधिशांच्या खुर्चीवर करणी केल्याच्या आरोपा प्रकरणी महिलेला अटक