नागपूर येथे उपमुख्यमंत्र्यांच्या घरासमोर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे निषेध आंदोलन !

महाराष्ट्रातील प्रकल्प अन्य राज्यांत जात असल्याचे प्रकरण !

सरकारने शिवप्रतापाची जागा शिवप्रतापदिनापूर्वी खुली न केल्यास शिवभक्त ती खुली करतील ! – नितीन शिंदे

अफझलखानाच्या थडग्याच्या उदात्तीकरणाच्या विरोधात शिवभक्तांची ‘मागणी परिषद’

अमेरिकेच्या वस्तूंवर बंदी घालण्यासाठी मुंबईत आंदोलन !

पाकिस्तानला साहाय्य करणार्‍या अमेरिकेच्या वस्तूंवर बंदी घालण्यासाठी आंदोलन करणार्‍या राष्ट्रप्रेमींचे अभिनंदन ! सरकारने या आंदोलनाची नोंद घेऊन अमेरिकेच्या वस्तूंवर बंदी घालून राष्ट्रकर्तव्य पार पाडावे !

हिंदु राष्ट्र करण्याच्या मागणीसाठी मोठे आंदोलन उभे करणे आवश्यक ! – विश्वनाथ कुलकर्णी, हिंदु जनजागृती समिती

राज्यघटनेत दुरुस्ती करून भारताला ‘धर्मनिरपेक्ष राष्ट्र’ करता येऊ शकते. त्याप्रमाणे घटनेत सुधारणा करून भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित का करता येऊ शकत नाही ? भारताला परत हिंदु राष्ट्र करण्यासाठी एक मोठे आंदोलन उभे करण्याची आवश्यकता आहे.

डोंबिवली येथे महानगरपालिकेच्या निष्क्रीय कारभाराच्या विरोधात नागरिकांचे आंदोलन !

नागरिकांवर आंदोलनाची वेळ येणे, हे महानगरपालिका प्रशासनाला लज्जास्पदच ! महापालिकेतील कर्तव्यचुकार अधिकार्‍यांना बडतर्फच करायला हवे !

‘हिंदु एकता आंदोलन’चे उंब्रज आणि पाटण (जिल्हा सातारा) या ठिकाणी पोलीस आणि प्रशासन यांना निवेदन

आतंकवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून समाजकंटकांच्या चौकशीची मागणी !

‘हुकूमशाही नाकारा’ : चीनसह जगभरात शी जिनपिंग यांच्याविरोधात अभूतपूर्व आंदोलन चालू !

 चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची सलग तिसर्‍यांदा राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांच्याविरोधात चीनमध्ये आंदोलन चालू करण्यात आले आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये हे आंदोलन पसरत आहे.

फ्रान्समधील प्रचंड महागाईच्या विरोधात लाखो फ्रेंच रस्त्यावर !

फ्रान्सखेरीज युरोपातील अन्य १९ देशांमध्येही हीच परिस्थिती आहे. इस्टॉनिया देशात सर्वाधिक २३ टक्के महागाई दर आहे, तर खंडातील सरासरी महागाई दर ८.९ टक्के या विक्रमी पातळीवर पोचला आहे.

बनारस हिंदु विश्‍वविद्यालयाच्या परीक्षेत गोमांसाविषयी प्रश्‍न विचारल्याने विद्यार्थी संतापले

गोमाता हिंदूंसाठी पूजनीय आहे, याची पूर्ण कल्पना असतांनाही गोमांसाविषयी परीक्षेत प्रश्‍न विचारणे, हा हिंदूंच्या धार्मिक भावनाचा जाणूनबुजून केलेला अवमान आहे. या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई व्हायला हवी, असेच धर्मप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी हिंदूंना वाटते !

इराणमध्ये हिजाबच्या विरोधात महिलांचे तीव्र आंदोलन !

इराणमध्ये ‘त्यांच्या’ सर्व महिलांचे डोके हिजाबने झाकलेले असणे कायद्यानुसार बंधनकारक आहे. त्याचे कथित उल्लंघन केल्याप्रकरणी २२ वर्षीय महसा अमिनी हिला मोरॅलिटी पोलिसांनी अटक केली होती, जिचा १६ सप्टेंबर २०२२ या दिवशी मृत्यू झाला.