सरकारने शिवप्रतापाची जागा शिवप्रतापदिनापूर्वी खुली न केल्यास शिवभक्त ती खुली करतील ! – नितीन शिंदे

अफझलखानाच्या थडग्याच्या उदात्तीकरणाच्या विरोधात शिवभक्तांची ‘मागणी परिषद’

शिवभक्तांच्या मागणी परिषदेत मनोगत व्यक्त करतांना श्री. नितीन शिंदे आणि मान्यवर

सांगली, ३० ऑक्टोबर (वार्ता.) – प्रतापगड येथील इस्लामीकरणाच्या विरोधात गेली २० वर्षे आम्ही लढा देत आहोत. राज्यात हिंदुत्वनिष्ठ विचारांचे सरकार असल्याने प्रतापगडावर असलेले अवैध बांधकाम तात्काळ पाडणे, तसेच अफझलखान वधाच्या जागेसमोर शिवप्रतापाचे भव्य शिल्प उभे करणे, या कृती अपेक्षित आहेत. त्यासाठीच ही मागणी परिषद आहे. ३० नोव्हेंबरला शिवप्रतापदिन असून तोपर्यंत शिवप्रतापाची जागा खुली न केल्यास शिवभक्त प्रतापगडावर जाऊन ती खुली करतील, अशी चेतावणी ‘श्री शिवप्रतापभूमी मुक्ती आंदोलना’चे निमंत्रक श्री. नितीन शिंदे यांनी दिली. ते श्री शिवप्रतापभूमी मुक्ती आंदोलनाच्या वतीने ३० ऑक्टोबर या दिवशी दैवेज्ञ भवन येथे शिवभक्तांच्या मागणी परिदषेत बोलत होते.

शिवभक्तांच्या मागणी परिषदेत मनोगत व्यक्त करतांना श्री. नितीन शिंदे आणि मान्यवर

या प्रसंगी अधिवक्त्या (सौ.) स्वाती शिंदे, माजी आमदार श्री. दिनकरतात्या पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक शिंदे, श्री. श्रीकांत शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. या परिषदेसाठी ‘हिंदू एकता आंदोलना’चे कार्याध्यक्ष श्री. नारायणराव कदम, भाजपचे प्रसिद्धीप्रमुख श्री. केदार खाडीलकर, भाजप प्रदेश कार्यकारिणीचे श्री. पृथ्वीराज पवार, भाजपचे श्री. ओंकार शुक्ल, शिवसेनेचे श्री. प्रसाद रिसवडे आणि श्री. राम काळे, श्री. प्रकाश निकम यांसह श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, भाजप, शिवसेना, श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान यांसह हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक श्री. आदित्य पटवर्धन यांनी केले.

शिवभक्तांच्या मागणी परिषदेत मनोगत व्यक्त करतांना श्री.  बाबासाहेब भोपळे, तसेच अन्य मान्यवर

या प्रसंगी कराड येथील हिंदू एकता आंदोलनाचे ज्येष्ठ नेते आणि नगरसेवक श्री. विनायक पावसकर म्हणाले, ‘‘येणार्‍या २० वर्षांत आपण जागे न झाल्यास आपल्याला धर्मांतर करावे लागेल, अशी स्थिती आहे. त्यामुळे हिंदूंनी यापुढील काळात संघटित होऊन आर्थिक व्यवहार हे आपल्या धर्मबांधवांसमवेतच करणे आवश्यक आहे.’’

विशेष

शिवभक्तांच्या मागणी परिदषेसाठी उपस्थित शिवप्रेमी नागरिक

१. उपस्थित मान्यवरांना भगव्या टोप्या देण्यात येत होत्या. सभास्थळी भगवे ध्वज लावण्यात आले होते, तसेच देण्यात येणार्‍या घोषणांमुळे वातावरण भगवेमय झाले.

शिवभक्तांच्या मागणी परिदषेसाठी उपस्थित शिवप्रेमी नागरिक

२. या प्रसंगी हिंदुत्वासाठी कार्य केलेले आणि निधन झालेले प्रवीण कवठेकर, रामभाऊ चव्हाण, संजय काकडे, संदीप सुतार, प्रा. विजय कुलकर्णी, तसेच अन्य कार्यकर्ते यांना श्रद्धांजली वहाण्यात आली.


राज्यातील प्रत्येक गडावरील अतिक्रमण काढण्याची मागणी सरकारकडे करा ! – श्री. बाबासाहेब भोपळे, विशाळगड रक्षण आणि अतिक्रमण विरोधी कृती समिती, कोल्हापूर

मनोगत व्यक्त करतांना श्री. बाबासाहेब भोपळे

 

विशाळगड चारही बाजूने अतिक्रमणाच्या विळख्यात असून त्यासंदर्भात पुरातत्व विभाग काही करत नाही, अशी स्थिती आहे. राज्यातील जवळपास प्रत्येक गडावर अशा प्रकारचे अतिक्रमण झालेले आहे. त्यामुळे यापुढील काळात राज्यातील सर्वच गड अतिक्रमणमुक्त करावेत, तसेच तेथील मंदिरांचा जिर्णाेद्धार झाला पाहिजे, अशी मागणी आपण सरकारकडे केली पाहिजे.

अनधिकृत बांधकाम हटवण्याच्या वनमंत्री सुधीर मुनगंटीवर यांच्या सूचना ! – नितीन शिंदे

या प्रसंगी श्री. नितीन शिंदे म्हणाले, ‘‘शिवप्रतापभूमी मुक्ती आंदोलनाच्या मागणीनुसार राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी असणार्‍या अफझलखान आणि सय्यद बंडाच्या थडग्याजवळील वनखात्याच्या भूमीवरील अनधिकृत बांधकाम पोलीस संरक्षण घेऊन हटवण्याच्या सूचना स्वतः वनमंत्री यांनी सातारा पालकमंत्री यांना दिल्या आहेत.’’