‘हिंदु एकता आंदोलन’चे उंब्रज आणि पाटण (जिल्हा सातारा) या ठिकाणी पोलीस आणि प्रशासन यांना निवेदन

आतंकवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून समाजकंटकांच्या चौकशीची मागणी !

उंब्रज पोलीस ठाण्यात निवेदन देतांना कार्यकर्ते

कराड, २० ऑक्टोबर (वार्ता.) – केंद्रशासनाने नुकतीच बंदी घातलेल्या पी.एफ्.आय. (पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया) या आतंकवादी संघटनेचे कार्य सातारा जिल्ह्यात चालू असल्याचे निदर्शनास येत आहे. काही समाजकंटकांचा संबंध या आतंकतवादी संघटनेशी असल्याची शक्यता गृहीत धरून चौकशी करण्याच्या मागणीचे निवेदन ‘हिंदु एकता आंदोलन’च्या वतीने उंब्रज आणि पाटण (जिल्हा सातारा) येथील पोलीस अन् प्रशासन यांना देण्यात आले.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, जिल्ह्यात बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमान स्थलांतरित झाले असून त्यांना साहाय्य करण्याचे कामसुद्धा या संशयित व्यक्तींकडून केले जात आहे. भविष्यात अशा घटनांमुळे दंगल घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा निवेदनात उल्लेख केलेल्या संशयितांची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी.

पाटण तहसीलदार कार्यालयात निवेदन देतांना कार्यकर्ते
पाटण पोलीस ठाण्यात निवेदन देतांना कार्यकर्ते

या मागणीचे निवेदन उंब्रज येथील पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड, पाटण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नितीन चौखंडे आणि पाटणचे तहसीलदार रमेश पाटील यांना देण्यात आले. उंब्रज येथे हिंदु एकता आंदोलनाचे श्री. महेश जाधव, तर पाटण येथे श्री. विलास मोरे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.