गोव्याला भविष्यात ‘योग भूमी’ म्हणून ओळखले जाईल ! – मुख्यमंत्री

या नियोजित तपोलोक योग क्षेत्राची वैशिष्ट्ये : सिंह द्वार, योग सेतू, योग स्तंभ, योग दालन, योग मंडळ, योग पथ, प्राणायाम क्षेत्र, अष्टांग योग क्षेत्र आणि गोमंतभूमी जनक ‘परशुराम’ची मूर्ती ! या प्रकल्पासाठी एकूण  ३३ कोटी ६८ लाख रुपये खर्च येणार आहे.

इंदुरीकर महाराजांवरील खटला चालू ठेवण्‍यासाठी सर्वोच्‍च न्‍यायालयात कॅव्‍हेट’ प्रविष्‍ट करण्‍याची अंनिसची घोषणा !

कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख उपाख्‍य इंदुरीकर महाराजांनी लिंगनिदान दाव्‍यासंबंधी वक्‍तव्‍य केल्‍याप्रकरणी महाराष्‍ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने इंदुरीकर महाराजांवरील खटला चालू ठेवण्‍यासाठी सर्वोच्‍च न्‍यायालयात ‘कॅव्‍हेट’ प्रविष्‍ट करणार असल्‍याची घोषणा केली आहे.

आरोग्य चांगले ठेवण्यासाठी नियमित योगा आवश्यक ! – जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह

आजच्या ताण-तणावाच्या जीवनशैलीमध्ये योगाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी नियमित योगा करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह यांनी केले.

गोतस्करांकडून गोरक्षकांवरील आक्रमणाच्या विरोधात नांदेड बंद !

महाराष्ट्रात गोतस्कर हे गोरक्षकांवर आक्रमण करून ठार मारतात, हे संतापजनक. वास्तविक गोतस्करांच्या कारवायांवर आळा घालण्याची मागणी करण्यासाठी ‘बंद’ पाळण्याची वेळ गोप्रेमींवर येऊ नये, असेच हिंदूंना वाटते !

प्रत्येकाने योगाचा अंतर्भाव स्वत:च्या दैनंदिन जीवनात करावा ! – विनायक जोशी

ब्राह्ममुहूर्तावर उठावे. त्या वेळी ऑक्सिजन पातळी अधिक असते. नियमित योग करावा, म्हणजे तंदुरुस्त रहाल. शरीर निरोगी आहे तो १८ तास काम करू शकतो. तो कधी उपाशी रहाणार नाही.

बुलढाणा येथील मेहकर महाविद्यालयाचे संकेतस्थळ अज्ञाताने ‘हॅक’ करून त्यावर ‘पाकिस्तान झिंदाबाद’ असे लिहिले !

सरकारने अशांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे !

मशिदींवरील भोंग्यांच्या आवाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी आम्ही गांभीर्याने प्रयत्न करत आहोत !

जनहित याचिकेवरून गुजरात सरकारचे उच्च न्यायालयात प्रतिपादन !

भारत स्वतंत्र असला, तरी आपली शिक्षणपद्धत पारतंत्र्यातील ! – जगदीश चौधरी निर्देशक, बालाजी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, हरियाणा

भारतीय स्वावलंबी न होता कायम गुलाम रहावेत, अशी शिक्षणपद्धत इंग्रजांनी निर्माण केली. अशा प्रकारच्या शिक्षणपद्धतीने इंग्रजांनी भारतियांचा कणा मोडून टाकला. भारतीय शिक्षण मोक्षप्राप्तीसाठी दिशा देणारे आहे.

सामाजिक दुष्प्रवृत्तींविरुद्ध घटनात्मक मार्गाने लढा देण्यासाठी हिंदु जनजागृती समितीचे ‘सुराज्य अभियान’ ! – विश्वनाथ कुलकर्णी, राज्य समन्वयक, पूर्व उत्तरप्रदेश आणि बिहार

आज सर्वच क्षेत्रांत भ्रष्टाचार बोकाळला आहे. याविषयी सर्वजण नाराज आहेत; पण त्याविषयी काय करता येईल, हे ठाऊक नसल्यामुळे ते अडकतात आणि भ्रष्ट व्यवस्थेचा एक भाग बनतात.