केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा
नवी देहली – आता देशातील प्रत्येक ट्रकमध्ये चालकाच्या केबिनमध्ये एसी, म्हणजेच वातानुकूलित यंत्र बसवणे बंधनकारक करण्यात येणार आहे. वर्ष २०२५ पासून हा निर्णय लागू होणार आहे, अशी घोषणा केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी केली. गडकरी यांनी हा नियम लागू करण्याच्या प्रस्तावावर स्वाक्षरीही केली आहे. कठीण परिस्थिती आणि रस्त्यांची अवस्था यांमुळे तासन्तास ट्रक चालवणारे चालक थकून जातात. याच कारणामुळे अनेक अपघातही होतात; म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे गडकरी म्हणाले.
Truck ड्राइवर्स के लिए नितिन गडकरी का बड़ा ऐलान#truck #NitinGadkarihttps://t.co/0pcOUYWy6W
— Zee Business (@ZeeBusiness) June 20, 2023
नितीन गडकरी पुढे म्हणाले, ‘आपल्या देशात काही चालक १२ ते १४ घंटे गाडी चालवतात. इतर देशांमध्ये बस आणि ट्रक चालकांच्या कामाचे घंटे निश्चित करण्यात आले आहेत. आपल्या देशात चालक ४३ ते ४७ अंश सेल्सियस तापमानातही गाडी चालवतात. यावरून आपण आपल्याकडील चालकांच्या परिस्थितीचा अंदाज लावू शकतो.’
अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहन उद्योगाला या नियमानुसार पालट करण्यासाठी १८ मासांचा वेळ आवश्यक आहे. रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने पहिल्यांदा वर्ष २०१६ मध्ये यासंदर्भातील प्रस्ताव आणला होता.