बारामती – शेतभूमीचा वाढीव मोबदला मिळण्यासाठीचा प्रस्ताव बारामतीच्या प्रांत कार्यालयास पाठवून केलेल्या कामाचा मोबदला म्हणून अडीच लाख रुपयांची लाच मागणार्या पाटबंधारे विभागाच्या दोघांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा नोंद केला आहे. संदीप गोंजारी आणि रणजीत सूर्यवंशी अशी आरोपींची नावे आहेत. (भ्रष्टाचारी कर्मचारी आणि अधिकारी यांच्यावर कारवाई करून त्यांना तात्काळ निलंबित केले पाहिजे. तरच भ्रष्टाचाराला आळा बसेल ! – संपादक) एका शेतकर्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे यासंदर्भात तक्रार प्रविष्ट केली होती. गोंजारी आणि सूर्यवंशी यांना न्यायालयाने सोमवार पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.