राष्ट्र आणि धर्म प्रेम असलेला युवा साधक जयेश कापशीकर (वय १४ वर्षे) याने गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

जयेश कापशीकर याच्या संदर्भातील लेख वाचल्यावर भारताची अजिबात काळजी वाटत नाही, उलट भारत जगातील एक श्रेष्ठ देश असेल, याची खात्री पटते. जयेश आणि त्याचे आई-वडील यांचे कौतुक करावे, तेवढे थोडे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

लहानपणापासून देशभक्तीच्या विचारांत रमणारा आणि देशाला अत्युच्च स्थानी नेण्याचे ध्येय असलेला कु. जयेश !

एकदा जयेशने ‘केसरी’ हा चित्रपट पाहिला. त्यात मुख्य सैनिकाला लढतांना वीरमरण येते. तो चित्रपट पाहिल्यावर बर्‍याच वेळा तो मला म्हणायचा, ‘‘आई, मलाही असेच माझ्या मातृभूमीसाठी लढतांना वीरमरण आले, तर किती चांगले होईल !’’

खडतर प्रारब्ध भोगत सकारात्मक राहून श्रद्धेच्या बळावर जीवन जगणार्‍या बेळगाव येथील श्रीमती सुमंगला मट्टीकल्ली यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

‘ऑनलाईन’ सत्संगाच्या माध्यमातून झालेल्या कार्यक्रमात धर्मप्रचारक श्री. काशिनाथ प्रभु यांनी ही आनंदवार्ता सर्वांनी दिली.

चिपळूण (रत्नागिरी) येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. ज्ञानदेव पाटील यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

प.पू. गुरुमाऊलींचा एकेक शब्द ऐकून काकांना पुष्कळ चैतन्य मिळत होते. त्या वेळी ‘मला जे हवे आहे, ते याच ठिकाणी मिळणार आहे’, याची काकांना निश्‍चिती झाली आणि त्यांनी साधनेला आरंभ केला.

सतत गुरुचरणांचा ध्यास असणार्‍या जळगाव येथील श्रीमती उषा बडगुजर (वय ६१ वर्षे) ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त !

६ जानेवारी या दिवशी श्रीमती उषा बडगुजर यांचा ६१ वा वाढदिवस होता. त्या निमित्ताने सद्गुरु नंदकुमार जाधवकाका यांनी ही आनंदवार्ता दिली.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना साधनेविषयी केलेले मार्गदर्शन !

परात्पर गुरु डॉक्टरांशी साधकांच्या झालेल्या भेटींच्या वेळच्या चित्रफितींमधील संवाद येथे देत आहोत.

विरार (जिल्हा पालघर) येथील सनातनच्या साधिका सौ. सुनीता राजपूत (वय ६५ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

२९ डिसेंबर २०२० या दिवशी सनातनच्या सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी ही आनंदवार्ता ‘ऑनलाईन’ सत्संगाच्या माध्यमातून दिली.

गुरूंचे कार्य ठरलेले असते, साधकाच्या आध्यात्मिक पातळीनुसार त्याला मार्गदर्शन करणारे गुरु भेटतात !

परात्पर गुरु हे ९५ टक्क्यांच्या अधिक आध्यात्मिक पातळीचे असून त्यांचे एक कार्य ‘संत घडवणे’ हे असते; म्हणून सनातनमध्ये ३ डिसेंबर २०२० पर्यंत ११० साधक संत झाले आहेत आणि १ सहस्र ३५३ साधक संत होण्याच्या मार्गावर आहेत.’

प.पू. गुरुदेवांप्रती भाव असलेल्या राजापूर येथील सौ. स्मिता प्रभुदेसाई (वय ७२ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

सद्गुरु सत्यवान कदम यांनी सौ. स्मिता प्रभुदेसाईकाकूंची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाली असून त्या जन्ममृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाल्या आहेत, अशी आनंदवार्ता दिली. ही आनंदवार्ता ऐकताच सर्व साधकांनी मनोमन गुरुदेवांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

धर्माचरणाची आवड असणारी चोपडा (जिल्हा जळगाव) येथील चि. रुद्राणी पाटील (वय २ वर्षे) हिची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित !

चोपडा येथील चि. रुद्राणी पाटील (वय २ वर्षे) हिची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असल्याचे सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी या घोषित केले.