वाकड (पुणे) येथे जैन संघाची स्थापना !
येथील जैन बांधवांसाठी जैन मंदिराची स्थापना करून त्यांना सहजतेने पूज्य तीर्थंकरांचे दर्शन, भक्ती आणि पूजा यांचा लाभ घेता यावा, या हेतूने या संस्थेची स्थापना करण्यात आली
येथील जैन बांधवांसाठी जैन मंदिराची स्थापना करून त्यांना सहजतेने पूज्य तीर्थंकरांचे दर्शन, भक्ती आणि पूजा यांचा लाभ घेता यावा, या हेतूने या संस्थेची स्थापना करण्यात आली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यवतमाळमध्ये विविध विकासकामांचे उद्घाटन केले. या वेळी बोलतांना मोदींनी ‘जय भवानी, जय शिवाजी, जय सेवालाल, जय बिरसा’ असे अभिवादन करून भाषणाला मराठीत प्रारंभ केला.
अधिवेशनात धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मोठ्या संख्येने यशवंत सेनेच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. पोलिसांनी त्यांना अडवून मंत्रालय आणि विधीमंडळ येथपर्यंत जाऊ दिले नाही.
पोलिसांच्या बदल्यांत पोलीस दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान आणि मोटर परिवहन विभाग यांचा समावेश करणारे ‘महाराष्ट्र पोलीस सुधारणा विधेयक २०२४’ हे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांनी मांडले आणि ते विधान परिषदेत संमत झाले.
मुंबईचा पैसा हा करदात्या नागरिकांचा असून तो त्यांच्यासाठीच खर्च झाला पाहिजे’, अशी मागणी काँग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली.
मुंबईमध्ये भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर आहे. त्याच्या लगत असलेल्या भिंतींजवळ अनेक अतिक्रमणांतून इमारती उभ्या राहिल्या आहेत. राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे, याकडे सरकारने लक्ष घातले पाहिजे, असे विधान भाजपचे सदस्य नितेश राणे यांनी विधानसभेमध्ये केले.
दरेकर पुढे म्हणाले की, मुंबईतील स्वच्छता कर्मचार्यांना केवळ ६ सहस्र रुपये मिळतात. जागतिक निविदा (‘ग्लोबल टेंडर’) काढल्यामुळे ७५ सहस्र स्वच्छता कर्मचार्यांवर बेकारीची कुर्हाड येऊ शकते.
‘मुंबई आणि अन्य महापालिका यांना एकच कायदा करावा’, या प्रश्नाविषयी उदय सामंत यांनी ‘मुंबई महापालिकेची लोकसंख्या १ कोटी ४० लाखांच्या पुढे असल्यामुळे एकच कायदा अन्य महापालिकांना लागू करू शकणार नाही’, असे सांगितले.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मुंबईच्या दिशेला येणार्या रस्त्यावर नवीन बोगदा झाला असल्याने मार्गात पालट करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री सचिवलयात कार्यवाहीसाठी आलेल्या काही निवेदनांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बनावट स्वाक्षरी, तसेच शिक्के असल्याचे सचिवालयाला निदर्शनास आले आहे.