वाकड (पुणे) येथे जैन संघाची स्थापना !

श्री वासुपूज्य

पिंपरी (जिल्हा पुणे) – श्री सकल संघ हितचिंतक पू. आचार्य हर्ष सागर सुरीजी यांचे शिष्य पू. हिरसागरजी एवं पू. नमिवर्षाश्रिजी यांच्या पावन सान्निध्यात वाकड परिसरातील जैन कुटुंबियांचा ‘श्री वासुपूज्य जैन संघ’ या नावाने श्री संघ स्थापन करण्यात आला. या संघात वाकड, हिंजवडी, जगताप डेअरी, नेरे आदी परिसरात रहाणार्‍या किंवा व्यवसाय करणार्‍या जैन बांधवांचा समावेश करण्यात आलेला आहे. येथील जैन बांधवांसाठी जैन मंदिराची स्थापना करून त्यांना सहजतेने पूज्य तीर्थंकरांचे दर्शन, भक्ती आणि पूजा यांचा लाभ घेता यावा, या हेतूने या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी श्री संघाचे संस्थापक अध्यक्ष रमेश ओसवाल, सचिव जैन आदींशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.