गुरुदेवांची कृपावृष्टी !

‘देव आपल्यासाठी किती करतो !; मात्र मीच किती उणा पडतो’, असे विचार माझ्या मनात घोळत होते. त्या वेळी गुरुदेवांना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना) आळवतांना जे शब्द स्फुरले, ते गुरुदेवा तुमच्या चरणी अर्पण करतो.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

हे गुरुराया तुम्ही किती मला क्षणोक्षणी भरभरून देता ।
झोळी फाटकी असल्याने मी मात्र रिकामा रहातो ।। १ ।।

हे गुरुराया अपेक्षांचा डोंगर अन् क्षणिक सुखाचा मोह ।
मन नि बुद्धी यांना घेऊन जाई कलीच्या विळख्यात ।। २ ।।

श्री. अविनाश जाधव

हे गुरुराया तुमची भरलेली ओंजळ सतत वहातच रहाते ।
या चैतन्यमय ओंजळीतील द्रव्यांकडे (टीप) हे मन दुर्लक्ष करते ।। ३ ।।

हे गुरुराया तुम्ही आमच्या साठी दिवसरात्र झटत रहाता ।
आम्ही मात्र क्षणिक मोहमायेच्या जंजाळात फसत जातो ।। ४ ।।

हे गुरुराया संकट समयी तुम्ही सदा धाऊन येता ।
आनंदाच्या प्रसंगी आम्ही मात्र तुम्हाला विसरून जातो ।। ५ ।।

हे गुरुराया आमच्या स्वभावदोषांवर पांघरूण घालून तुम्हीच सांभाळ करता ।
आम्ही बहिर्मुख दृष्टीने केवळ ‘स्व’च्या विचारांत भरकटत रहातो ।। ६ ।।

हे गुरुराया तुम्ही नसता तर आमचे जगणे अशक्य झाले असते ।
तुमचे कृपाछत्र आम्हाला जीवनात उभारी देऊन जाते ।। ७ ।।

हे गुरुराया किती कृतज्ञता व्यक्त करावी तुमच्या कोमल चरणी ।
या पामराला सांभाळून घ्या तुम्ही सदा तव चरणी, सदा तव चरणी ।। ८ ।।

टीप – नाम, सत्संग, सेवा, त्याग, प्रीती

।। श्रीमन्नारायणामस्तु ।।’

– श्री. अविनाश जाधव, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक