पुणे येथील ‘दगडूशेठ’ गणपति मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतींची पुष्पसजावट !

पुणे – ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपति ट्रस्ट’ आणि सुवर्णयुग तरुण मंडळ यांच्या वतीने येथील ‘दगडूशेठ’ गणपति मंदिरात २३ मे या दिवशी गाभार्‍यासह प्रवेशद्वारावर शेषनागाच्या विविधरंगी भव्य फुलांच्या भव्य प्रतिकृती साकारून सजावट करण्यात आली. याच दिवशी (गणेश जयंती) श्री गणेशाचा पाताळातील म्हणजेच शेषात्मज गणेश अवतार झाला होता. गणेश जयंतीनिमित्त मंदिरात ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत पहाटे ३ वाजता ब्रह्मणस्पति सुक्त अभिषेक पार पडला. त्यानंतर पहाटे ४ वाजता गायक ऋषिकेश रानडे आणि सहकारी यांनी स्वराभिषेकातून गणरायाचरणी स्वरसेवा अर्पण केली, तसेच मंदिरात गणेश याग, सहस्रावर्तने असे धार्मिक विधीही पार पडले.