नवीन पनवेलसह कळंबोली आणि करंजाडे क्षेत्रात २ दिवस पाणीपुरवठा बंद !

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने तातडीने मुख्य जलवाहिनी पालटण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे नवीन पनवेलसह कळंबोली, काळुंद्रे, करंजाडे या नोडमधील (क्षेत्रातील) पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

कोल्हापूर येथील लक्ष्मी मंदिरातील ५ लाख ७२ सहस्र रुपयांचे दागिने चोरीला !

हालेवाडी वस्तीतील लक्ष्मी मंदिराच्या द्वाराचे कुलूप तोडून चोरट्यांनी मूर्तीच्या अंगावरील ५ लाख ७२ सहस्र रुपयांचे १४ तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले. घटना उघडकीस आल्यानंतर ग्रामस्थांनी मंदिराच्या आवारात मोठी गर्दी केली.

अनुमती देण्याच्या नावाखाली व्यापार्‍यांची अडवणूक थांबवा ! – आमदार विजयकुमार देशमुख, भाजप

वर्षानुवर्षे श्री गणेशमूर्तींची विक्री, तसेच गौरींचे मुखवटे यांच्या विक्रीसाठी दुकानाच्या बाहेर व्यापारी ५ फुटांचा मंडप घालतात; मात्र महापालिका प्रशासन अनुमती देण्याच्या नावाखाली व्यापार्‍यांची अडवणूक करत आहे, हा प्रकार थांबायला हवा.

भूमी बळकावण्याच्या एका प्रकरणात केवळ ३४ दिवसांत भूमीची ‘म्युटेशन’ प्रक्रिया केली पूर्ण !

भूमी बळकावल्याच्या प्रकरणी प्रमुख संशयित रॉयसन रॉड्रिग्स याला विशेष अन्वेषण पथकाने कह्यात घेतल्यानंतर आता या प्रकरणी धक्कादायक माहिती उघडकीस येत आहे.

कामोठे (नवी मुंबई) येथे सी.एन्.जी.मध्ये होणार्‍या भेसळीविरोधात मनसेची तक्रार !

या पंपावर इंधन भरण्यासाठी गेल्यावर एल्.पी.जी.युक्त सी.एन्.जी. भरला जात असल्याचे मनसेचे रायगड जिल्हा सरचिटणीस जयसिंग पाटील यांच्या लक्षात आले.

संभाजीनगर येथील भोंदू बाबासाहेब शिंदे यांचा बंदोबस्त न केल्यास शिवसेना पद्धतीने उत्तर देणार ! – अंबादास दानवे, विधान परिषदेचे नेते

अर्धांगवायू, हृदयविकाराचा झटका आणि कुणाचे मूत्रपिंड खराब झालेल्या आजारांवर केवळ डोक्यावर हात ठेवून बरे करण्याचा दावा करणे चुकीचे आहे…

धर्मांध कितीही शिकले, तरी गुन्हेगारी वृत्ती कायम रहाते !

हमीरपूर (उत्तरप्रदेश) येथील महिला दिवाणी न्यायाधिशांशी गैरवर्तन केल्याच्या प्रकरणी अधिवक्ता महंमद हारून याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्याने न्यायाधिशांविषयी अश्लील विधाने केली होती.

आंदोलन आणि ‘टूलकिट’ यांचा परस्परसंबंध !

सध्या आंदोलनांच्या संदर्भात ‘टूलकिट’चा वापर झाला असला, तरी ‘टूलकिट’ हे मोठ्या प्रमाणात ‘कॉर्पाेरेट्स’, राजकीय पक्ष, शैक्षणिक संस्था आणि अनेक जण आपापल्या कामांसाठी वापरतात. अल्प वेळेत अधिक लोकांपर्यंत योजना पोचावी, यासाठी ‘टूलकिट’चा वापर केला जातो.

खोल श्वास घेणे, हे मनुष्यासाठी एक परिपूर्ण औषध !

श्वास हा आयुष्याचा आधार आहे. मन आणि जीवन यांमधील रहस्यमय दोरी आहे. श्वास, ज्याच्या आधारे कुणीही प्राणी आयुष्यात पाऊल ठेवतो. म्हणून शारीरिक संरचनेत श्वासाच्या गतीचे स्थान महत्त्वपूर्ण आहे !

खाद्यपदार्थांच्या संदर्भात विवेक जागृत ठेवावा !

सुकामेवा खर्चिक वाटत असल्यास गूळ-शेंगदाणे, तीळ-गूळ, भाजलेले फुटाणे, डिंकाचे किंवा मेथीचे लाडू यांसारखे पौष्टिक पदार्थ भुकेच्या प्रमाणात खावेत. पोषणमूल्यहीन आणि आरोग्य बिघडवणारे पदार्थ खाण्यापेक्षा पौष्टिक, सात्त्विक आणि नैसर्गिक पदार्थ खावेत.