डोंबिवली येथे घरफोड्या आणि चोरी करणार्‍या ३ आरोपींना अटक !

डोंबिवली परिसरात येऊन घरफोड्या करून सोने आणि किमती ऐवज चोरणार्‍या अभिजित अलोक रॉय (वय ३६ वर्षे) याला मुंबई येथील कामाठीपुरा भागातून येथील मानपाडा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी अटक केली आहे

जलसिंचन मंडळात बनावट वैद्यकीय देयके सादर करणारे ‘रॅकेट’ !

जिल्हा रुग्णालय आणि सातारा सिंचन मंडळात बनावट वैद्यकीय देयके सिद्ध करून सरकारची फसवणूक करणारे मोठे ‘रॅकेट’ कार्यरत आहे, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.

कोल्हापूर, सांगलीतील पुराचे पाणी मराठवाड्याकडे वळवण्यावर चर्चा !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात सध्या चालू असलेल्या, तसेच इतर प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. या बैठकीत कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांतील महापूर, तसेच अतीवृष्टीचे पाणी मराठवाड्याकडे वळवण्यासाठीच्या योजनेवर चर्चा करण्यात आली.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे २ अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कह्यात !

अंगणवाडीच्या कामाचे अंदाजपत्रक मान्य करून घेण्यासाठी अडीच सहस्र रुपयांची लाच घेतांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या २ अधिकार्‍यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कह्यात घेतले.

विधीमंडळाच्या सचिवांकडून शिवसेनेच्या ५३ आमदारांना नोटीस !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील ३९ आणि उद्धव ठाकरे यांच्या गटातील १४ अशा शिवसेनेच्या ५३ आमदारांना विधीमंडळाच्या सचिवांकडून ‘कारणे दाखवा’ नोटीस देण्यात आली आहे.

गेवराई (जिल्हा बीड) येथील सरकारी भूमीवर मंदिर किंवा मशीद बांधकामासाठी अनुमती देऊ नये !

निवेदनात म्हटले आहे की, येथील पोलीस ठाण्याच्या उत्तर बाजूस आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या उद्यानाच्या दक्षिण बाजूला असलेल्या सरकारी भूमीवर काही हिंदू आणि मुसलमान अनुक्रमे मंदिर अन् मशीद बांधण्याचा प्रयत्न करत आहेत

औंध (पुणे) रुग्णालयातील जिल्हा चिकित्सक कनकवळे यांच्यासह तिघांना लाच घेतांना अटक !

सोनोग्राफी केंद्राचा परवाना नूतनीकरण करण्यासाठीची सर्व कागदपत्रे संबंधित रुग्णालयाकडे दिली होती. तरीही आधुनिक वैद्य कनकवळे, गिरी आणि कडाळे यांनी संगनमत करून संबंधित व्यक्तीकडे ४० सहस्र रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती १२ सहस्र रुपये देण्याचे निश्चित झाले होते.

गडचिरोली जिल्ह्यात ट्रक वाहून गेल्याने तिघांचा मृत्यू !

जिल्ह्यातील आलापल्लीवरून भामरागडला जातांना एक ट्रक ९ जुलै या दिवशी पुराच्या पाण्यात वाहून गेला. ट्रकमधून प्रवास करणार्‍या तिघांचा मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह सापडले आहेत.

‘सुंदर माझे कार्यालय’ उपक्रम राज्यातील सर्व कार्यालयांत कार्यक्षमपणे राबवावा ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने राबवण्यात आलेला ‘सुंदर माझे कार्यालय’ हा उपक्रम स्तुत्य असून राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांत हा उपक्रम कार्यक्षमपणे राबवण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

येत्या विधीमंडळ अधिवेशनात दक्षिण मुंबईत वीर सावरकर यांच्या शौर्यगाथेचे संग्रहालय उभारण्याचा आग्रह धरणार ! – अधिवक्ता राहुल नार्वेकर, अध्यक्ष, विधानसभा

अधिवक्ता नार्वेकर यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. या वेळी ते म्हणाले, ‘‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासारख्या क्रांतीकारकांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची देशातील नागरिकांना माहिती देणे, हे आपले कर्तव्य आहे.