प्रभो मज एकच वर द्यावा । या चरणांच्या ठायीं माझा निश्चल भाव रहावा ।।
ज्यांची साधकांना आस लागली आहे, ज्यांच्या केवळ स्मरणानेही साधकांच्या मनी कृतार्थतेचा भाव दाटतो, ते सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे मनोहारी चरणकमल !
ज्यांची साधकांना आस लागली आहे, ज्यांच्या केवळ स्मरणानेही साधकांच्या मनी कृतार्थतेचा भाव दाटतो, ते सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे मनोहारी चरणकमल !
भगीरथाच्या प्रयत्नांमुळे शिवाच्या जटेतून ‘गंगा’ पृथ्वीवर आली. सनातनच्या आश्रमातील ‘श्रीराम शाळिग्राम’ हा शिवाच्या जटेतील गंगेत निर्माण झालेला शाळिग्राम आहे. . हा शाळिग्राम सत्ययुगातच पृथ्वीवर आला असून कलियुगात कार्तिकपुत्री येईपर्यंत तो त्यांची वाट पहात होता.
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी सप्तर्षी (गुरुदेवांविषयी) म्हणतात, ‘सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे गोत्र ‘अत्री’ आहे. ऋषीपत्नी अनुसूया हिच्या तपोबळाने ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांनी श्री दत्तगुरूंच्या रूपात ज्यांच्या घरी जन्म घेतला, ते अत्री ऋषीच आहेत.
साधकांना राजयोग्याप्रमाणे सुविधा देणारे परात्पर गुरु डॉक्टर स्वतः संन्यस्त जीवन जगतात. सनातनच्या रामनाथी आश्रमात एका खोलीत परात्पर गुरु डॉक्टरांचे वास्तव्य आहे.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी आधुनिक वैद्य, आदर्श पुत्र, आदर्श पती, उत्तम शिष्य, अनेक ग्रंथांचे संकलक, गुरु, द्रष्टा, संशोधक, अशा अनेक रूपांमध्ये कार्य केले आहे आणि करत आहेत. गुरुकृपायोग अलौकिक साधनामार्गाच्या निर्मितीविषयी त्यांचे कार्य या सूत्रांमधून जाणून घेणार आहोत.
हे भगवंता, ‘न भूतो न भविष्यति ।’ असे गुरुदेव आम्हा साधकांना देऊन आमच्यावर अनंत कृपा केली आहेस, यासाठी आम्ही तुझ्या चरणी कोटीश: कृतज्ञ आहोत.
गायनसेवेच्या संदर्भात भगवंताने घडवलेली सुंदर लीला !
‘त्रेता आणि द्वापर या युगांमध्ये माणसांमध्ये स्वभावदोष अन् अहं नसतातच, असे नसून कलियुगातील माणसांच्या तुलनेत त्यांचे प्रमाण अल्प असते. त्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘गुरुकृपायोगा’च्या अंतर्गत सांगितलेली ‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन’ प्रक्रिया ही कलियुग संपल्यानंतर येणार्या त्रेता अन् द्वापर युगांमध्येही उपयोगी पडणारच आहे.’
काळानुसार पालटत गेलेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संबोधनांविषयीचे स्पष्टीकरण पुढे केले आहे.
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दर्शनाने प्रत्येक वेळी भावजागृती होऊन मला हृदयात नेहमीच एक वेगळीच आत्मिक जाणीव अनुभवता येते. २२.५.२०२२ या दिवशी परात्पर गुरु डॉक्टरांचा झालेला मंगलमय रथोत्सव पहातांना मला त्यांच्या प्रती कृतज्ञता वाटून भावाश्रू आवरता येत नव्हते.