पाद्यपूजन सोहळ्यात अवतरित झालेल्या श्री सरस्वतीतत्त्वाच्या जागृतीसाठी सप्तर्षींच्या आज्ञेने गायनसेवा सादर !

गायनसेवेच्या संदर्भात भगवंताने घडवलेली सुंदर लीला !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे श्री दत्तात्रेय रूपातील पाद्यपूजन झाल्यावर छायाचित्रीकरणाची सेवा चालू असतांना सप्तर्षींनी आज्ञा केली की, या सोहळ्यात आज श्री सरस्वतीतत्त्वही अवतरित झाले आहे. त्यामुळे त्याला जागृती देण्यासाठी गुरुदेवांसमोर सरस्वतीदेवीविषयीचे गायन सादर करावे. सप्तर्षींच्या आज्ञेने महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत समन्वयक सुश्री (कु.) तेजल पात्रीकर यांनी गुरुत्रयींच्या चरणी ‘जय शारदे वागीश्वरी…’, हे गीत सादर केले.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी कु. तेजल यांना गाण्याविषयी विचारणे आणि पूजनानंतर सप्तर्षींनीही गायनसेवा करण्यास सांगणे

सुश्री (कु.) तेजल पात्रीक

 

१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी सुश्री (कु.) तेजल पात्रीकर यांना गाण्याविषयी विचारणे : ‘सोहळ्यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले पूजनस्थळी येताच तिथे उपस्थित असलेल्या महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत समन्वयक सुश्री (कु.) तेजल अशोक पात्रीकर यांना त्यांनी विचारले, ‘आज तुझे गाणे नाही का ?’ त्या वेळी गायनसेवा नसल्यामुळे कु. तेजल यांनी ‘नाही’, असे सांगितले. त्यानंतर पूजन चालू असतांनाही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी त्यांना २ वेळा विचारले की, ‘आज तू बोलणार नाहीस का ?’ तेव्हाही त्यांनी ‘नाही’, असे सांगितले. नियोजन तसेच होते.

२. पूजन झाल्यानंतर सप्तर्षींनी कु. तेजल यांना श्री सरस्वतीदेवीची स्तुती करणारे गीत गाण्यास सांगणे : पाद्यपूजन सोहळा झाल्यानंतर पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांचा भ्रमणभाष आला. तेव्हा ते म्हणाले, ‘‘सप्तर्षी सांगत आहेत की, तिथे गायन करणारी एक साधिका आहे. आज आश्रमात श्री दत्ततत्त्वासह श्री सरस्वतीदेवीचे तत्त्वही जागृत आहे. त्यामुळे गायन करणार्‍या साधिकेने गुरूंसमोर हंसवाहिनीतत्त्व जागृत करणारे गीत गावे.’’

सप्तर्षींच्या आज्ञेने तिथे सेवा करणारी साधिका सुश्री (कु.) तेजल अशोक पात्रीकर यांनी ‘जय शारदे वागीश्वरी…’ हे गीत सादर केले.

३. ईश्वरेच्छा जाणणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले ! : या सगळ्या घटनाक्रमात सर्वांत महत्त्वाचे अधोरेखित होते की, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी पूजनस्थळी आल्या आल्याच कु. तेजल यांना गायनाविषयी विचारले होते. त्या दिवशी कु. तेजल यांनी गाणे ईश्वरनियोजितच होते. ती ईश्वरेच्छा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी जाणली होती, हेच यातून लक्षात येते.’

– श्री. विनायक शानभाग (१९.७.२०२२)