आषाढी एकादशीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महापूजा !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – १० जुलै या दिवशी आषाढी एकादशी आहे. या दिवशी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा होणार आहे, अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. वारकरी भक्त ज्याची आस लावून होते, तो आषाढी वारी सोहळा २ वर्षांनंतर मोठ्या उत्साहात पार पडत आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्यासह अनेक मानाच्या पालख्या ९ जुलै या दिवशी पंढरपूरमध्ये पोचणार आहेत.