अमरावती – येथील औषध विक्रेता उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणी अटक केलेल्या ७ आरोपींपैकी डॉ. युसूफ खान याला न्यायालयाने ६ जुलैपर्यंत, तर अन्य आरोपींना ५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी अतीब रशीद आदिल रशीद याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. सातवा आरोपी इरफान शेख याला ३ जुलै या दिवशी अमरावती न्यायालयात उपस्थित करण्यात आले. त्याला ७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.