शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील हे शिवसेनेतच !

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील

पुणे – अवघ्या काही घंट्यांपूर्वी शिवसेनेकडून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईला स्थगिती देण्यात आलेली आहे. पक्षविरोधी कारवाई केल्याच्या आरोपांखाली आढळराव पाटील यांचे उपनेतेपद काढून घेण्यात आले होते; मात्र आता हा आदेश मागे घेण्यात आला आहे, अशी माहिती शिवसेनेकडून देण्यात आलेली आहे.

३ जुलै या दिवशी दैनिक ‘सामना’मध्ये प्रसिद्ध झालेली बातमी अनावधानाने प्रसिद्ध झाली आहे. शिवाजीराव आढळराव पाटील हे शिवसेना उपनेते म्हणून शिवसेनेमध्येच कार्यरत आहेत, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.