पू. रत्नमाला दळवी (वय ४५ वर्षे) या संतपदी घोषित झाल्याच्या दिनांकाचे देवाने लक्षात आणून दिलेले वैशिष्ट्य !

गुणरत्नांची माला असलेल्या (सुश्री (कु.)) रत्नमाला दळवी यांचे संतपद घोषित करण्यासाठी देवाने विचारपूर्वक दिवस निवडला असावा’, असे मला वाटले.

पू. (सुश्री (कु.)) रत्नमाला दळवी
कु. नलिनी राऊत

१. ६.३.२२ म्हणजे ३ दुणे ६ ! देवाने असा पू. रत्नमालाताईंच्या गुणांचा गुणाकार केला, तरीही देवाला एकदा गुणाकार करून पू. ताईंच्या गुणरत्नांना योग्य न्याय दिल्याचे समाधान होईना; म्हणून देवाने अजून एकदा गुणाकार करण्यासाठी २ निवडला. ३ दुणे ६ असा गुणाकार २ वेळा (२२) केला. ६.३.२२ यातील २ आणि २ ची बेरीज ४ होते. म्हणजे चतुर्थी ! या दिवशीची ‘फाल्गुन शुक्ल ४, विनायक चतुर्थी’, ही तिथी वैशिष्ट्यपूर्ण होती.

२. बुद्धीच्या संदर्भातील सेवा करणाऱ्या पू. रत्नमालाताईंचे संतपद घोषित करण्यासाठी देवाने बुद्धीची देवता असणाऱ्या विनायकाच्या चतुर्थीची तिथी निवडली.

गुरुमाऊलीच्या (देवाच्या) या अपार कृपेसाठी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !

– सुश्री (कु.) नलिनी राऊत (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के),