ऋषीयागाच्या पूर्णाहुतीच्या वेळी ‘विष्णुलोकातच गेलो आहोत’, असे जाणवणे

ऋषीयागाच्या पूर्णाहुतीच्या वेळी परात्पर गुरुदेव विष्णूच्या रूपात पंचमुखी नागावर पहुडलेले दिसणे, ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ या लक्ष्मीदेवी आणि अन्य पुरोहित साधक ऋषी आहेत’, असे दिसून ‘विष्णुलोकातच गेलो आहोत’, असे जाणवणे

कु. हर्ष गोसावी

‘९.१.२०१९ या दिवशी ऋषीयागाची पूर्णाहुती चालू होती. तेव्हा श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ तेथे उपस्थित असून  अन्य पुरोहित उभे राहून पूर्णाहुती देत होते. त्या वेळी मी यज्ञ परिसरात मागे उभा होतो. अकस्मात् माझे लक्ष आकाशात उडत असलेल्या बगळ्यांच्या थव्याकडे गेले. त्यानंतर मी परत यज्ञ बघायला आरंभ केल्यावर मला परात्पर गुरुदेव विष्णूच्या रूपात पंचमुखी नागावर पहुडलेले दिसले. ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ या लक्ष्मीदेवी आणि अन्य पुरोहित साधक ऋषी आहेत’, असे दिसून ‘मी जणू विष्णुलोकातच गेलो आहे’, असे मला जाणवले. ही अनुभूती ३० सेकंद आली. यज्ञ झाल्यावर मला संध्याकाळपासूनच रात्रीपर्यंत ७० टक्के कृतींना भाव जोडता येऊ लागला. त्यामुळे मला पुष्कळ आनंद मिळाला.

‘हे परात्पर गुरुमाऊली, ‘तुम्हीच ही अनुभूती देऊन या लहान लेकराला भरभरून आनंद दिला. साधनेसाठी स्फूर्ती दिली’, त्याबद्दल मी परात्पर गुरुदेव आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’

– कु. हर्ष गोसावी (वय १८ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.१.२०१९)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक