अशीच राहो गुरुदेवा, तुमची अखंड कृपा ।

सर्व साधकांवर कृपादृष्टी असणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

१७.६.२०२० या दिवशी मला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शांतीविधी झाला. त्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने मला सुचलेली कविता पुढे दिली आहे. ‘गुरुदेवा, अशीच तुमची कृपा असू दे’, ही प्रार्थना !

श्री. आत्माराम जोशी

वर्ष १९९० पासून साधनेत आहे, ही तुमची (टीप १) कृपा ।
प.पू. बाबांच्या (टीप २) अमृत महोत्सव सोहळ्यात सेवा मिळाली, ही तुमची कृपा ।
प.पू. बाबांच्या भजनांचा लाभ झाला, ही तुमची कृपा ।
वयाची ७५ वर्षे पूर्ण झाली, ही सर्व तुमची कृपा ।। १ ।।

निरनिराळ्या ठिकाणी गुरुपौर्णिमा
अन् अध्यात्मप्रसार यांची सेवा मिळाली ।
हिंदु अधिवेशनातही सेवा मिळाली ।
सेवेत वेगवेगळ्या अनुभूती आल्या ।
ही सर्व गुरुदेवा आपलीच कृपा ।। २ ।।

उन्नत आणि अन्य साधक यांची भेट झाली ।
साधकांकडून शिकायला मिळाले ।
साधकांनी सेवेत चुका लक्षात आणून दिल्या ।
ही सर्व गुरुदेवा आपलीच कृपा ।। ३ ।।

विविध सत्संगांचा लाभ झाला ।
संत आणि उन्नत साधक यांचे मार्गदर्शन लाभले ।
स्वभावदोष अन् अहं निर्मूलन कसे करायचे, हे शिकलो ।
ही सर्व गुरुदेवा आपलीच कृपा ।। ४ ।।

‘माझी आध्यात्मिक उन्नती करवून घ्या’, अशी श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी प्रार्थना !

टीप १ : परात्पर गुरु डॉ. आठवले

टीप २ : प.पू. भक्तराज महाराज

– श्री. आत्माराम जोशी, फोंडा, गोवा. (३०.६.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक