हिंदु राष्ट्र प्रसार अभियान आणि ‘ज्ञानशक्ति प्रसार अभियान’ यांना मुंबई जिल्ह्यात उत्तम प्रतिसाद !

श्री. सुनील घनवट यांचा मुंबई दौऱ्यात येथील आमदार, खासदार, अधिवक्ता, उद्योजक, तसेच प्रतिष्ठित नागरिक यांच्या भेटीच्या वेळी त्यांनी सनातनच्या ‘ज्ञानशक्ति प्रसार अभियाना’विषयीही माहिती सांगितली. त्यातील वृत्तांत देत आहोत.

घोडेबाजार रोखण्यासाठी भाजपने २६ नगरसेवक गोव्याला सहलीसाठी पाठवले !

अशा पद्धतीने घेतलेल्या निवडणुकीतून जनतेचे कधीतरी भले होईल का ? हिंदु राष्ट्रात अशा स्वरूपाच्या निवडणुका नसतील. घोडेबाजार रोखण्यासाठी सहलीला पाठवावे लागणे, हे लोकराज्याचे अपयश !

हिवाळी अधिवेशन मुंबईत; कामकाज केवळ ५ दिवसच चालणार !

२९ नोव्हेंबर या दिवशी झालेल्या विधीमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

‘ओमिक्रॉन’ला रोखण्यासाठी मुंबई महापालिकेकडून कडक निर्बंध लागू !

प्रत्येक कोविड केंद्राचे लेखा परीक्षण (ऑडिट) करण्यात येणार आहे. संसर्गाची बाधा होऊ नये यासाठी मुखपट्टीचा वापर न करणार्‍यांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. दिवसाला २५ सहस्र जणांवर कारवाई करण्याचे लक्ष्य ठरवण्यात आले आहे.

राज्यातील ‘ओमिक्रॉन’च्या संसर्गाविषयी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांशी चर्चा करावी ! – मंत्रीमंडळाची मागणी

या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘देशभरातील आंतरराष्ट्रीय, तसेच देशांतर्गत विमानसेवांनी प्रवाशांची माहिती नियमितपणे एकमेकांना दिल्यास रुग्ण प्रवासी आणि त्यांच्या संपर्कातील प्रवासी यांना शोधणे सोपे जाईल’, असे मत व्यक्त केले.

२० कोटी रुपयांची थकित ‘एफ्.आर्.पी.’ची रक्कम १३ साखर कारखान्यांकडून वसूल केली जाणार !

वर्ष २०१४-१५ पासून नांदेड विभागातील २० साखर कारखाने हे शेतकर्‍यांना टप्प्याटप्प्याने ‘एफ्.आर्.पी.’ची रक्कम देत होते; मात्र स्वतःच्या सोयीनुसार रक्कम देतांना त्यांना विलंब व्याजाचा विसर पडला.

काळजी म्हणून पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील कोविड सेंटर चालू रहातील ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

सध्या तरी पुणे तसेच पिंपरी-चिंचवडमधील ‘जम्बो कोविड सेंटर’ चालूच राहील आणि ३१ डिसेंबरला आढावा घेऊन पुढील निर्णय घेऊ, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे येथे सांगितले.

शेंद्रे (सातारा) येथे ९ लाख रुपयांचा गुटखा शासनाधीन !

गुटखा तस्करीची माहिती मिळताच पोलिसांनी पथक सिद्ध करून शेंद्रेजवळ सापळा रचला आणि धाड टाकली.

मंदिरांवरील ‘जिझिया कर’ !

मंदिरांच्या रक्षणासाठी ‘मंदिरे राष्ट्राची आधारशीला असतात’ हे सार्थ ठरवणारे हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे !

शिरवळ (सातारा) येथे पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या दोघांवर गुन्हा नोंद !

पिस्तूल विक्रीसाठी २ जण येतात म्हणजे त्यांचा व्यवसायच आहे, हे लक्षात येते. पोलिसांनी याची पाळेमुळे खणून काढणे आवश्यक आहे.