सातारा, २९ नोव्हेंबर (वार्ता.) – शेंद्रे येथील महामार्गाजवळ कर्नाटक राज्यातून आलेला ९ लाख रुपयांचा गुटखा एका वाहनातून दुसर्या वाहनात भरतांना पोलिसांनी धाड टाकून कह्यात घेतले. या वेळी पोलिसांनी दोन्ही वाहने कह्यात घेत आर्.एम्.डी., विमल पान मसाला, आणि ‘व्ही-१’ गुटख्याचे खोके, दोन्ही चारचाकी वाहने असा २० लाख ९२ सहस्र ८०० रुपयांचा मुद्देमाल शासनाधीन केला.
महाराष्ट्रात गुटखाबंदी असून परराज्यातून गुटखा विक्रीसाठी महाराष्ट्रात येत आहे. सातारा पोलीसदल याविषयी विशेष लक्ष ठेवून आहे. गुटखा तस्करीची माहिती मिळताच पोलिसांनी पथक सिद्ध करून शेंद्रेजवळ सापळा रचला आणि धाड टाकली.