|

नागपूर – नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत घोडेबाजार होऊ नये, यासाठी भाजपकडून काळजी घेतली जात आहे. भाजपने स्वतःच्या २६ नगरसेवकांना सहलीसाठी २९ नोव्हेंबरच्या रात्री १ वाजता विमानाने गोवा येथे रवाना केले आहे, तर उर्वरित नगरसेवक विविध ठिकाणी जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नागपूर महापालिकेत भाजपचे १०८ नगरसेवक असून पक्षाची एक हाती सत्ता आहे. त्यामुळे मतांविषयी काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष यांपेक्षा भाजपचे पारडे जड आहे. दुसरीकडे काँग्रेसलाही स्वतःचे नगरसेवक पळवण्याची भीती असल्याने काँग्रेसनेही रणनीती आखण्यास प्रारंभ केला आहे. नागपूर विधान परिषदेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरले गेले आहेत. भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे, तर काँग्रेसकडून छोटू भोयर मैदानात आहेत. या निवडणुकीत ५५६ मतदार असून सध्या ६० मतांनी भाजपचे पारडे जड आहे. ‘निवडणूक लढवण्यासाठी जे जे करावे लागेल, ते ते आम्ही करू. आम्ही ४०० हून अधिक मतांनी ही निवडणूक जिंकू’, असा विश्वास भाजपचे शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके यांनी व्यक्त केला आहे.
मालमत्ता नोंदणीसह ‘जलमेट्रो’ला गती आणि ३१ ऑगस्टपासून विधानसभा अधिवेशन
राज्यातील ४२३ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तेचे केले जाणार मुद्रीकरण !
थोडक्यात महत्त्वाचे (२३.०७.२०२६)
काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, अध्यक्ष, भाजप, मुंबई
रावेत-नर्हे ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’च्या ‘डी.पी.आर्.’ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मान्यता !
संत मुक्ताई पालखीचे ७०० किलोमीटर प्रवास करून मोहोळ (जिल्हा सोलापूर) तालुक्यात आगमन !