सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधनेला आरंभ केल्यावर सेवेत गुरुदेवांनी पदोपदी साहाय्य केल्याची आलेली अनुभूती !

सौ. राजश्री तिवारी

‘पूर्वी माझे आयुष्य चार भिंतींतच होते; कारण आमच्याकडे पडदापद्धत (घरातील महिलांनी सर्वांसमोर न येता पडद्याआडून संभाषण करण्याची पद्धत) होती. त्यामुळे कधीच परपुरुषांशी बोलण्याचा प्रसंग आला नाही. मी माझे महाविद्यालयीन शिक्षणही घरात राहून पूर्ण केले. मी केवळ परीक्षेलाच जात असे. माझ्या नातेवाइकांनी माझा आवाज लग्नात उखाणा घेतांना ऐकला. मग समाजात जाऊन संवाद साधणे, ही तर लांबची गोष्ट !

मी २००२ मध्ये सनातन संस्थेच्या संपर्कात आले आणि माझे आयुष्य पूर्णतः पालटून गेले. मी सनातन संस्थेमुळेच समाजात वावरायला शिकले. त्यामुळे आता धर्मप्रेमींना भेटतांना माझ्याकडून एकच प्रार्थना होते, ‘गुरुदेव, हे डोळे तुमचे आहेत आणि ही वाणीही तुमचीच आहे. तेव्हा तुम्हाला जे पहायचे आहे, तेच मला पहाता येऊ दे. तुम्हाला जे अपेक्षित आहे, तेच मला बोलता येऊ दे.’ त्या वेळी ‘गुरुदेवच माझ्याकडून तसे बोलून घेतात, तसेच ज्या हिंदुत्वनिष्ठांना धर्माची आतून ओढ आहे, त्यांनाच भेटण्याची बुद्धी देतात’, अशी मला अनुभूती येते. ‘हे गुरुदेवा, तुमच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता !’

– सौ. राजश्री तिवारी, सोलापूर (१५.९.२०१८)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक