कुख्यात गुंड रवि पुजारी याला ९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी

गजाली रेस्टॉरंटमधील गोळीबाराच्या प्रकरणी अटकेत असलेला कुख्यात गुंड रवि पुजारी याला मुंबई सत्र न्यायालयाने ९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. मुंबईच्या गुन्हे अन्वेषण शाखेचे सहपोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी ही माहिती दिली.

माघ द्वादशीलाही श्री विठ्ठल मंदिर दर्शनासाठी बंद रहाणार !

कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने २४ फेब्रुवारी (माघ शुक्ल पक्ष द्वादशी) या दिवशी श्री विठ्ठल मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत.

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेत भाजपची सत्ता असतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्विजय सूर्यवंशी महापौरपदी विजयी

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेत भाजपची सत्ता असतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्विजय सूर्यवंशी हे महापौरपदी विजयी झाले आहेत. दिग्विजय सूर्यवंशी यांना ३९ मते, तर भाजपचे महापौरपदाचे उमेदवार धीरज सूर्यवंशी यांना ३६ मते मिळाली.

संजय राठोड यांच्या मुसक्या आवळल्याच पाहिजेत ! – सौ. चित्रा वाघ, प्रदेश उपाध्यक्षा, भाजप

सौ. चित्रा वाघ म्हणाल्या, ‘‘या सगळ्या बलात्कार्‍यांना पाठीशी घालण्यासाठी मंत्र्यांची चढाओढ चालू आहे. ‘तू अधिक बोलतो कि मी’, हे चित्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्राला मुळीच साजेसे नाही.

बीड जिल्ह्यातील शंतनू मुळूक यांची टूलकिट प्रकरणी देहली पोलिसांकडून चौकशी

टूलकिट प्रकरणी देहली पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयात वकिली करणार्‍या निकीता जेकब आणि बीड येथील अभियंता शंतनू मुळूक यांच्यावर आरोप केलेले आहेत. या प्रकरणी २२ फेब्रुवारी या दिवशी दोघांचीही देहली पोलिसांनी चौकशी केली.

शिवरायांच्या राज्यशैलीचे अनुकरण केल्यास भारत महासत्ता बनेल ! – छत्रपती उदयनराजे भोसले

केवळ आम्हीच नाही, तर शिवरायांना मानणारी प्रत्येक व्यक्ती ही शिवरायांचा वंशज आहे. आगामी काळात शिवगान स्पर्धा अधिक व्यापक पद्धतीने आयोजित करण्यात आमचे नेहमीच सहकार्य राहील. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज एकमेवाद्वितीय राजे होते.

सर्व लोकप्रतिनिधींच्या संपत्तीची चौकशी करा !

आयकर विभागाने मध्यप्रदेशातील बैतूल येथील काँग्रेसचे आमदार निलय डागा यांच्या सोया उत्पादन करणार्‍या आस्थापनातील गैरव्यवहारावरून डागा आणि कुटुंबीय यांच्या २२ ठिकाणांवर धाडी घालून ४५० कोटी रुपयांची बेहिशोबी संपत्ती जप्त केली.

जालना येथे दळणवळण बंदी नाही; पण कठोर निर्बंध लागू !

यामध्ये ३१ मार्चपर्यंत इयत्ता १० वी आणि १२ वीच्या शाळा वगळता इतर शाळा, वसतीगृहे, शिकवणीवर्ग, यात्रा, आठवडी बाजार, मोर्चे, आंदोलने हे सर्व बंद रहाणार आहे. शाळा, शिकवणी वर्ग आणि महाविद्यालये जरी बंद असली, तरी शिक्षकांना मात्र शाळेत जाऊन आपले कर्तव्य पार पाडावे लागणार आहे.

अकोला येथे संचारबंदीत जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासह पेट्रोल पंपांवर गर्दी

जीवनावश्यक वस्तू वगळता इतर सर्व दुकाने बंद असली, तरीही काही जणांनी ही दुकाने चालू केली आहेत. त्यामुळे अशा दुकानांवर महापालिका प्रशासन, पोलीस आणि महसूल विभागातील कर्मचारी एकत्र फिरून संबंधितांवर कारवाई करत आहेत.

एकाच वसतीगृहातील ४० विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण !

शहरातील एम्.आय.डी.सी. परिसरातील एका वसतीगृहातील एका मुलीला कोरोनाची लागण झाली होती. या मुलीच्या संपर्कात आलेल्या अन्य ४० विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.