कळंगुट येथील श्री शांतादुर्गा नास्नोडकरीण देवीच्या जागेत मलनिस्सारण प्रकल्प होऊ देणार नाही !  आमदार मायकल लोबो

हा प्रकल्प या जागेतून रहित करून दुसर्‍या जागेत नेण्यासाठी आवश्यक प्रक्रिया मी चालू करीन’, असे आश्‍वासन कळंगुट मतदारसंघाचे आमदार मायकल लोबो यांनी १८ जानेवारीला येथे झालेल्या सभेच्या वेळी दिले.

मगोपचे माजी आमदार लवू मामलेदार ६ वर्षांसाठी पक्षातून बडतर्फ

मगो पक्षाच्या सर्वसाधारण बैठकीत ठराव घेऊन मगो पक्षाचे मुख्य सचिव आणि माजी आमदार लवू मामलेदार यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली. यानुसार त्यांना पुढील ६ वर्षांसाठी पक्षातून बाहेर ठेवण्यात येईल.

सोयीस्कर अभिव्यक्ती स्वातंत्र्य !

कोणते कपडे घालायचे, याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला असते; म्हणून कुणी नग्न फिरायला लागला, तर त्याला निर्लज्जपणा किंवा स्वैराचार म्हणतात. याचे भान लहान मुलालाही असते. संस्कृती, सभ्यता, पावित्र्य या शब्दांपर्यंत जाण्याची कुवत नसल्यामुळे तृप्ती देसाई यांना एवढे कळले, तरी पुरेसे आहे.

आयआयटी प्रकल्पासाठी नवीन भूमी शोधण्यासाठी तज्ञांचा गट नेमणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

गोव्यात आयआयटी प्रकल्प स्थापन करण्यासाठी सरकार सुमारे ४ ते ५ सदस्यांचा समावेश असलेला एक तज्ञांचा गट बनवणार आहे. या गटात शिक्षण तज्ञ, आयआयटी पदवीधर आदींचा समावेश असेल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण देवीच्या जत्रोत्सवाला थाटात प्रारंभ

१८ जानेवारीला सकाळी श्रींस महाअभिषेक झाला. रात्री विधीपूर्वक नमन, शिबिकोत्सव, पालखी, जागर आणि आरती प्रसाद होईल. १९ जानेवारीला रात्री श्रींची अंबारी रथातून मिरवणूक होईल. २० जानेवारीला रात्री जागर, शिबिकोत्सव, श्रींची फुलांच्या रथातून मिरवणूक आदी होईल.

‘‘ऑफलाईन’ परीक्षेला बसा अन्यथा घरी चला ! ’’

‘ऑफलाईन’ परीक्षेला विरोध करणार्‍या ‘एन्.एस्.यू.आय.’च्या विद्यार्थी सदस्यांना जी.व्ही.एम्. महाविद्यालयाच्या प्राचार्यांची चेतावणी !

वर्ष १९७० चा काळ हिंदी चित्रपटासाठी सुवर्णकाळ ठरला ! – राहुल रवैल,चित्रपट निर्माते

‘५०, ६० आणि ७० च्या दशकांतील चित्रपटनिर्मिती’, या विषयावर आयोजित परिसंवादात चित्रपट निर्माते राहुल रवैल बोलत होते. या संवाद कार्यक्रमात ‘व्हर्च्युअल’ पद्धतीने अनेक महनीय व्यक्तींनी सहभाग घेतला.

काँग्रेसचा दुटप्पीपणा आणि त्याने लाभासाठी न्यायसंस्थेचा केलेला वापर !

सरन्यायाधिशांच्या आदेशाविषयी किंवा निवाड्याविषयी शंका व्यक्त करणे, हा सर्वोच्च न्यायालयाचा अवमान आहे. सर्वोच्च न्यायालयाने अधिवक्ता प्रशांत भूषण यांना अवमान प्रकरणी दंडित केले होते, याचा दिनेश गुंडू राव यांना विसर पडलेला दिसतो.

सिंधु देशासाठी भारताने साहाय्य करावे !

पाकच्या सिंध प्रांतातील सान शहरात ‘स्वतंत्र सिंधु देशा’च्या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला होता. ‘आंतरराष्ट्रीय समुदायाने आमच्या स्वातंत्र्यलढ्यात हस्तक्षेप करावा’, अशी मागणी या वेळी करण्यात आली.