पुणे पोलिसांकडून गुजरात येथे धाड घालून कोट्यवधींचा गुटखा जप्त

गुटखा विक्रेत्याच्या गुजरात, तसेच दादरा आणि नगर हवेली येथील सिल्वासा येथील ‘काशी व्हेंचर्स’ या आस्थापनावर धाड घालत १५ कोटी रुपयांचा गुटखा आणि त्यासाठीचा कच्चा माल जप्त केला.

कोरोनाविषयक चाचण्यांच्या दराविषयी अधिसूचना लागू

कोरोनासंदर्भातील वैद्यकीय चाचण्यांचे दर शासनाने अधिसूचनेद्वारे घोषित केले आहेत. शासकीय आणि खासगी रुग्णालयांसाठी हे दर समान असतील. पूर्ण स्वयंचलित ‘आर्टी-पीसीआर्’ चाचणीसाठी २ सहस्र ४३० रुपये आकारले जातील.

स्वतःच्या वेतनातून खर्च भागत असल्याचे सांगून वेतनातील ५ रुपये न्यून करण्यास सांगणारे लालबहादूर शास्त्री !

कुठे लालबहादूर शास्त्री आणि कुठे आजचे काँग्रेसी ! आज किती काँग्रेसी आणि लोकप्रतिनिधी असे वागतात ?

पेण बलात्कार प्रकरणाचा खटला अधिवक्ता उज्ज्वल निकम यांनी लढवावा – मनसे

पेण शहरातील आदिवासी पाड्यात रहाणार्‍या ३ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करणार्‍यात आली. या बलात्कार प्रकरणाचा खटला अधिवक्ता उज्ज्वल निकम यांनी लढवावा, अशी मागणी मनसेने केली आहे.

मेळावली येथील आय.आय.टी. प्रकल्पाच्या भूसर्वेक्षणाचे काम उद्या चालू रहाणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

मेळावली येथे आय.आय.टी. प्रकल्प उभारण्याविषयी गोवा शासन ठाम आहे. या प्रकल्पाला तेथील स्थानिक ग्रामस्थांचा विरोध आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार येथील अंदाजे १७ ग्रामस्थ कुटुंबीय प्रकल्पासाठीच्या सरकारी भूमीवर लागवड करतात.

पाकिस्तानमध्ये राजधानी इस्लामाबादसह अनेक शहरांमध्ये वीजपुरवठा खंडित

जळीस्थळी पाकला भारताच दिसतो, याचे हे आणखी एक उदाहरण !

शनिशिंगणापूर येथील शनैश्‍वर देवस्थानचे नवीन अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची निवड

नगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर येथील शनैश्‍वर देवस्थानच्या विश्‍वस्त पदावर अध्यक्षपदी भागवत सोपान बानकर आणि उपाध्यक्षपदी विकास नानासाहेब बानकर यांची निवड करण्यात आली आहे.

गुलामगिरीची प्रतीके कधी हटणार ?

नवी देहली येथील लुटीयन्स भागातील औरंगजेब मार्ग लिहिलेल्या फलकावर ‘गुरु तेग बहादुर लेन’ लिहिल्याच्या प्रकरणी पोलिसांनी ११ जणांना कह्यात घेतले असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. अधिवक्ता अनुराधा भार्गव यांच्या नेतृत्वाखाली ही कृती करण्यात आली.

नूतनीकरण केलेले आयनॉक्स मल्टीप्लेक्स आणि गोवा मनोरंजन संस्थेचा लोगो यांचे आज उद्घाटन

गोवा मनोरंजन संस्थेचे नूतनीकरण केलेले आयनॉक्स मल्टीप्लेक्स आणि गोवा मनोरंजन संस्थेचा लोगो यांचे उद्घाटन ११ जानेवारीला सायंकाळी ६.३० वाजता संस्थेच्या संकुलात राज्याचे मुख्यमंत्री तथा गोवा मनोरंजन संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते होणार आहे.