११ जानेवारी २०२१ या दिवशी लालबहादूर शास्त्री यांचा स्मृतीदिन आहे. यानिमित्ताने…
लालबहादूर शास्त्री काँग्रेसचे सरचिटणीस असतांना त्यांना प्रतिमास ६० रुपये वेतन होते, जे ते आपल्या पत्नीकडे देत आणि त्यामध्ये त्यांचा सगळा खर्च चालत असे. एकदा त्यांचा एक जवळचा मित्र त्यांच्याकडे आला. त्याला त्याच्या मुलाच्या शस्त्रक्रियेसाठी ६० रुपये उसने पाहिजे होते; म्हणून त्यांनी शास्त्रीजींकडे ६० रुपये मागितले. शास्त्रीजी म्हणाले, ‘‘माझे वेतनच तेवढे आहे, ज्यामध्ये माझ्या कुटुंबाचा खर्च जेमतेम भागतो. मी तुला कुठून पैसे देऊ ?’’ शास्त्रीजींची पत्नी हे बोलणे ऐकत होती. त्या म्हणाल्या, ‘‘त्याची आजची निकड महत्त्वाची आहे. माझ्याकडे ६० रुपये आहेत, ते आपण त्यांना द्या.’’ शास्त्रीजींनी त्याला पैसे दिले. तो मित्र गेल्यावर त्यांनी पत्नीला विचारले की, हे पैसे तू कुठून आणलेस ? त्या म्हणाल्या, ‘‘तुमच्या प्रत्येक मासातील वेतनातून मी ५ रुपये साठवत होते. त्याचे १ वर्षाचे असे साठलेले ६० रुपये माझ्याकडे होते.’’ त्यानंतर लालबहादूर शास्त्री यांनी काँग्रेस अध्यक्षांना पत्र लिहिले आणि स्वतःचे वेतन ५५ रुपये करण्याची विनंती केली. त्यांनी असे लिहिले की, माझा मासाचा खर्च ५५ रुपयांत भागतो !
(संदर्भ : व्हॉट्सअॅप)
(कुठे लालबहादूर शास्त्री आणि कुठे आजचे काँग्रेसी ! आज किती काँग्रेसी आणि लोकप्रतिनिधी असे वागतात ? – संपादक)