नागरिकांना नववर्षांचे स्वागत करायला द्यावे, यासाठी मनसेकडून मुख्यमंत्र्यांना विनंती !

‘वर्षभर आम्ही तुमचे ऐकले, आता १ दिवस आमचे ऐका. नागरिकांना ३१ डिसेंबरला नववर्षाचे स्वागत करू द्या’, अशी विनंती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाराचा राजकारणासाठी उपयोग महाराष्ट्रात पाहिलेला नाही ! – अनिल देशमुख, गृहमंत्री

भाजपच्या विरोधात बोलणार्‍यांच्या मागे अंमलबजावणी संचालनालयाची चौकशी लावली जाते.=अनिल देशमुख

३१ डिसेंबरच्या अपप्रकारांच्या विरोधात नांदेड येथे उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांना निवेदन

३१ डिसेंबरच्या निमित्त ऐतिहासिक गड-किल्ल्यांच्या ठिकाणी होणार्‍या मेजवान्या आणि सार्वजनिक मद्यपान, धूम्रपान यांवर प्रतिबंध आणावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आली. त्याविषयी नांदेड येथील उपजिल्हाधिकारी श्री. प्रदीप कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले.

मुंबईतील अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयावर शिवसैनिकांनी ‘भाजप प्रदेश कार्यालय’ असा फलक लावला

सौ. वर्षा राऊत यांना समन्स आल्यावर शिवसैनिकांनी अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयावर ‘भाजप प्रदेश कार्यालय’ असा फलक लावला.

ऊर्जेसाठी श्री महालक्ष्मीदेवीचे आशीर्वाद घेण्यास येतो ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

वर्ष २०२० हे सर्वांसाठीच अडचणीचे ठरले आहे. आता नव्या वर्षाच्या आगमनापूर्वी आईचे दर्शन घेतले आहे. जेव्हा कधी ऊर्जेची आवश्यकता असते, तेव्हा आशीर्वाद आवश्यक असतो, त्या वेळी आशीर्वाद घेण्यासाठी मी येतो, असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.

माहूरगड येथील दत्त जयंती यात्रा रहित

श्री दत्त संस्थान, माहूरगड यांच्या वतीने पारंपरिक दत्तजयंती सोहळा या वर्षी कोरोनाच्या साथीमुळे रहित करण्यात आला आहे. यात्रेला येणार्‍या भाविकांना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून श्री दत्त संस्थानच्या विश्‍वस्तांनी हा निर्णय घेतला आहे.

८ मासांनंतर शनिशिंगणापूरमध्ये भाविकांचे मोठ्या संख्येत शनिदर्शन

३ दिवसांच्या सलग सुट्ट्यांच्या कालावधीत शनिशिंगणापूर मंदिर परिसरात पुष्कळ गर्दी होती. नाताळला प्राधान्य न देता ७० सहस्रांहून अधिक हिंदु भाविकांनी आनंदाने शनिदर्शन घेतले. सकाळी आठ वाजता चालू झालेला दर्शनाचा ओघ रात्री उशिरापर्यंत टिकून होता.

३१ डिसेंबर साजरा न करण्याच्या निमगाव ग्रामस्थांच्या या निर्धाराचे ग्रामपंचायतीकडून कौतुक !

हिंदूंनी पाश्चात्य संस्कृतीला हद्दपार करून हिंदु धर्मानुसार आचरण करावे = हिंदु जनजागृती समिती

 राज्य परिवहन मंडळाला मिळणार्‍या कर्जाचा प्रस्ताव स्थगित ?

बँकेकडून कर्जासाठी राज्य सरकारकडून हमी मिळत नसल्याने प्रस्ताव रखडला

३१ डिसेंबरला गडकोट, ऐतिहासिक आणि सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, धूम्रपान, ‘पार्ट्या’ करणे यांना प्रतिबंध करा !

धर्मप्रेमींचे पन्हाळा नायब तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना निवेदन