ध्वनीप्रदूषण करणारे भोंगे हटवा ! – विश्व हिंदु परिषद, बजरंग दल यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
ध्वनीप्रदूषण करणारे भोंगे हटवण्यात यावेत, या मागणीचे निवेदन विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने जिल्हाधिकारी एम्.जी. हिरेमठ यांना देण्यात आले.
ध्वनीप्रदूषण करणारे भोंगे हटवण्यात यावेत, या मागणीचे निवेदन विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने जिल्हाधिकारी एम्.जी. हिरेमठ यांना देण्यात आले.
वीज ग्राहकांना वाढीव वीजदेयकातून दिलासा देण्यास सरकारने असमर्थता व्यक्त केली आहे. ‘मीटर रिडिंग’प्रमाणे आलेली देयके ग्राहकांनी भरलीच पाहिजेत, असे राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
एप्रिल आणि मे मध्ये ‘महावितरण’कडून घरोघरी जाऊन ‘मीटर रीडिंग’ घेणे, वीजदेयके पाठवणे बंद होते. आता दळणवळण बंदी जवळपास हटवण्यात आल्यामुळे महावितरणकडून घरोघरी जाऊन ‘रीडिंग’ घेण्यास प्रारंभ झाला असूनही …
हुलजंती येथे महालिंगराया यात्रेच्या वेळी जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी लाठीमार केला. या प्रकरणी पालख्यांसमवेतचे भाविक, तसेच यात्रा कमिटीच्या पदाधिकार्यांसह ७४ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
श्री विठ्ठलाचे दिवसभरात २ सहस्र भाविकांना ऑनलाईन बुकिंग करून मुखदर्शन घेता येणार आहे. भाविकांकडून होणारी मागणी लक्षात घेऊन मंदिर समितीने हा निर्णय घेतला असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष यांनी दिली.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा १७ नोव्हेंबर या दिवशी आठवा स्मृतीदिन छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथील त्यांच्या स्मृतीस्थळावर साजरा करण्यात आला. या वेळी राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कुटुंबासह या स्मृतीस्थळावर आदरांजली वाहिली.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या विद्यमान सभागृहाची मुदत १५ नोव्हेंबर या दिवशी संपली. यामुळे महापालिकेवर प्रशासक म्हणून आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सरकारी रुग्णालयांना लागणारा औषधांचा पुरवठा करूनही महाराष्ट्रातील पुरवठादारांची सरकारकडे अनुमाने १७० कोटी रुपयांची रक्कम थकीत राहिली आहे
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ‘सिरम इन्स्टिट्यूट’मध्ये कोरोना लसीचे आतापर्यंत ६ कोटी डोस सिद्ध केले आहेत. सरकारने दिलेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात देशातील ३० कोटी लोकांना लस देण्यात येणार आहे.
अभय बनसोडे या आरोपीने ओळखीचा अपलाभ घेऊन १३ नोव्हेंबर या दिवशी १७ वर्षीय तरुणीला घरी सोडतो, असे खोटे सांगून ‘लॉज’वर नेले आणि तिथे तिच्यावर अत्याचार केला. बलात्कार्यांना तत्काळ आणि कठोर शिक्षा झाल्याविना अशा घटना थांबणार नाहीत !