टाय घालणारे आजचे वैद्य !

‘काही वैद्य आता इंग्रजी भाषेत आयुर्वेद शिकवतात आणि दवाखान्यात सात्त्विक धोतर इत्यादीऐवजी पँट, शर्ट, टाय घालतात. त्यांचे अनुकरण करून उद्या मंदिरांतील पुजारी पँट घालायला लागले, तर आश्चर्य वाटणार नाही ! हे टाळण्यासाठी हिंदु राष्ट्र हवे.’

हिंदूंनो, ‘लव्ह जिहाद’ला त्याच भाषेत तोंड देण्याचा विचार नका करू !

हिंदु मुलींना प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्यांच्याशी विवाह करणार्‍या धर्मांधांना पाप लागते. ते त्यांना भोगावेच लागते. हिंदूंनी तसेच केले, तर त्यांनाही पाप भोगावे लागेल. तसे होऊ नये म्हणून त्यांनी हिंदु मुलींना धर्मशिक्षण देण्यावर लक्ष केंद्रित करावे.’

आत्मघातकी बुद्धीप्रामाण्‍यवादी !

‘बुद्धीप्रामाण्‍यवादी त्‍यांच्‍या अंधश्रद्धेने श्राद्ध इत्‍यादी काही करत नाहीत. त्‍यामुळे त्‍यांचे पूर्वज त्‍या योनीत शेकडो वर्षे अडकून पडतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

मानव-निर्मित वस्तूंपेक्षा देवाने केलेली निर्मिती अधिक आनंददायी !

‘मानवाने कितीही कौशल्य वापरून बांधलेल्या इमारती बघण्यापेक्षा निसर्गाच्या आकाश, वायू, प्रकाश, पाणी, भूमी, वनस्पती यांसारख्या विविध घटकांना अनुभवल्यावर आपल्याला अधिक चांगले वाटते. याचे मुख्य कारण म्हणजे, ते सर्व देवाने बनवलेले आहे.’

ज्योतिषशास्त्राचे माहात्म्य !

‘कुठे पुढील काही वर्षांत काय होणार, याचा अंदाज बुद्धीचा वापर करून सांगणारे पाश्चात्त्य, तर कुठे युगायुगांच्या संदर्भात सांगणारे ज्योतिषशास्त्र !’ 

व्यक्तीस्वातंत्र्यवाल्यांनी गाठलेली परमावधीची अधोगती !

‘पुढे व्यक्तीस्वातंत्र्यवाले ‘आम्हाला बलात्कार, भ्रष्टाचार, खून इत्यादी सर्व करण्याचा अधिकार आहे !’, असे समजतील; पण दुसर्‍याच्या व्यक्तीस्वातंत्र्याचा, उदा. बलात्कार होणार्‍याच्या व्यक्तीस्वातंत्र्याचा विचार करणार नाहीत ! एवढेच नाही, तर धर्मावरील अत्याचारही वाढवतील !’

हिंदूंनो, राष्ट्रहितासाठी तरी साधना करा !

‘आतंकवादी, जिहादी, चीन इत्यादी आक्रमकांना बौद्धिक नाही, तर आध्यात्मिक स्तरावरच हरवता येते; म्हणून हिंदूंनो, साधना करा !’

केवळ हिंदु धर्मात अनेक देव कसे ?

हिंदु धर्म सर्वांत परिपूर्ण असा धर्म आहे. पाश्चात्त्य वैद्यकशास्त्राचे उदाहरण घेतले, तर हे लक्षात येईल की, पूर्वी विविध रोगांवर असलेली औषधे मर्यादित संख्येची होती. विज्ञानाने प्रगती केली, तशी औषधांची संख्या बरीच वाढली. त्याचप्रमाणे परिपूर्ण हिंदु धर्मात अनेक देव आहेत. असे असले, तरी हिंदु धर्मातही परमेश्वर किंवा ब्रह्म एकच आहे.’

हिंदूंनो, यासाठी साधना करा !

‘चीनने भारतावर आक्रमण केल्यास चीनला नक्षलवादी आणि साम्यवादी साहाय्य करतील. पाकिस्तानने भारतावर आक्रमण केल्यास पाकला जिहादी साहाय्य करतील; पण हिंदूंच्या साहाय्याला देव सोडून कोण आहे ? देवाचे साहाय्य मिळवण्यासाठी हिंदूंनो, साधना करा !’

शालेय शिक्षणाची व्यर्थता !

विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञानापुरते आवश्यक तेवढे शिक्षण देऊन त्यांचा बाकीचा वेळ वरील विषय शिकवण्यापेक्षा समाजप्रेम, राष्ट्रप्रेम, धर्मप्रेम, अध्यात्मशास्त्र, साधना यांसारखे विषय शिकवण्यासाठी का वापरत नाही ? हिंदु राष्ट्रात असे सर्व विषय शिकवले जातील.’