हास्यास्पद असलेला साम्यवाद !

‘वनस्पती, प्राणी, मानव इत्यादींत साम्यवाद नाही. एवढेच नव्हे, तर पृथ्वीवर ७०० कोटींहून अधिक असलेल्या मानवांपैकी कोणत्याही दोन मानवांचे धन, शिक्षण, शरीर, मन, बुद्धी आणि चित्त यांत साम्य नाही. असे असतांना ‘साम्यवाद’ म्हणणे हास्यास्पद नाही का ?’

जेथे अहंकार, तेथे भक्तीचा लय !

‘जेथे अहंकार आहे, तेथे भक्तीचा लय होतो आणि जेथे भक्ती उदयास येते, तेथे निश्चितच अहंकाराचा लय होतो; म्हणून आपल्या अंतरातील भक्ती वाढवून निरहंकारी भगवंताची कृपा संपादन करूया !’

मुलांना साधना न शिकवल्याचा हा आहे परिणाम !

‘म्हातारपणी मुले लक्ष देत नाहीत’, असे म्हणणार्‍या वृद्धांनो, तुम्ही मुलांवर साधनेचे संस्कार केले नाहीत, याचे ते फळ आहे. याला मुलांबरोबर तुम्हीही उत्तरदायी आहात !’

एवढेच का विज्ञानाचे महत्त्व ?

‘अध्यात्मशास्त्रातील शिकवणीच्या संदर्भात ‘का आणि कसे ?’ यांचे शास्त्र सांगतांना आधुनिक विज्ञानाचा वापर होतो. ‘अध्यात्म अंतिम सत्य सांगते’, हे सिद्ध करायला, म्हणजे बुद्धीप्रामाण्यवाद्यांचे तोंड बंद करायला वैज्ञानिक उपकरणांचा उपयोग होतो. एवढेच काय ते विज्ञानाचे महत्त्व !’ 

साधक आणि भक्त यांचे श्रेष्ठत्व !

‘विविध राजकीय पक्ष ‘स्वतःच्या पक्षाचे राज्य हवे’, यासाठी पैसे वाटप इत्यादी वाईट मार्गांचा वापर करतात. याउलट साधक आणि भक्त ‘ईश्वराचे राज्य स्थापन व्हावे’, यासाठी प्रयत्नशील असतात.’ 

रामाची भक्ती करण्याने आपला संसार हा सुखाचा होईल

रामाची भक्ती करण्याने आपला संसार हा आपली कल्पनाही होणार नाही इतका सुखाचा होईल. भगवंताचे नाम मनापासूनच घेत नाही, इथेच आपले चुकते.

बुद्धीप्रामाण्यवादी अधोगतीला का जातात?

‘बुद्धीप्रामाण्यवादी पुरोगामी नाही, तर अधोगामी असतात. त्यामुळे ते अधोगतीला जातात !’ 

भगवंत आणि त्याचे नाम एकरूपच !

आपण ज्याच्या पोटी जन्माला आलो, त्याचेच नाव आपण आपल्या नावापुढे लावतो, तसे भगवंताविषयीही करावे. त्याच्याच नावाने जगावे, म्हणजे ‘माझा सर्व कर्ता, रक्षिता, तो एकच असून…

मला एकटे वाटते; पण मी एकटा कधीच नाही.

भावार्थ : ‘मला एकटे वाटते’, हे मानसिक दृष्टीने म्हटलेले आहे. ‘मी एकटा कधीच नाही’, हे आध्यात्मिक दृष्टीने म्हटलेले आहे. याचा अर्थ आहे, ‘ईश्वर नेहमी माझ्या समवेत आहे’, याची मला निश्चिती आहे.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले

धर्मपालन करण्यामागील कार्यकारणभाव शिकवणे आवश्यक !

‘हिंदूंच्या गेल्या काही पिढ्यांना धर्मपालन करण्यामागील कार्यकारणभाव सांगितला गेला नाही. त्यामुळे आता त्यांच्यासाठी धर्माचे महत्त्व न्यून झाले आहे. यासाठी आता विद्यार्थीदशेतील मुलांना शालेय शिक्षणासमवेत धर्मपालन करण्यामागील कार्यकारणभावही शिकवणे आवश्यक आहे.’