ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची शिकवण

तुमच्या आयुष्यातील जे रिकामे क्षण आहेत, तेवढे जरी तुम्ही नाम घेत भगवंताला अर्पण केले, तरीसुद्धा तो नामधारकांचा दास होऊन रहातो !

बुद्धीप्रामाण्यवाद्यांमुळे अध्यात्मातील विविध अंगांना मुकणारे हिंदू !

पूर्वीच्या काळी ‘बुद्धीला पटते, तेच खरे’, अशा वृत्तीचा समाज आणि अधिवक्ता इत्यादी नसल्याने ‘मारुति एका उड्डाणात श्रीलंकेला पोचला’, अशासारख्या रामायणातील, तसेच महाभारतातील आणि विविध पुराणांतील ऐतिहासिक कथा, त्याचप्रमाणे ‘ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या तोंडून वेद वदवले’ इत्यादी इतिहास सांगणार्‍यांना शिक्षा केली गेली नाही. आता ‘बुद्धीपलीकडील काही अनुभवले, तर ते छापू नका’, असा अधिवक्त्यांचा सल्ला सर्वांना असतो ! त्यामुळे मानवाला फार मोठ्या घटना आणि त्यांचे शास्त्र यांपासून वंचित रहावे लागत आहे. हिंदुराष्ट्रात बुद्धीपलीकडील सांगणार्‍यांचा गौरव केला जाईल.’

हिंदू समाज धर्म विसरल्याचाच हा परिपाक !

‘धर्मांधांना त्यांच्या धर्माकडून शक्ती मिळते; म्हणून ते धर्मासाठी आत्मसमर्पणही करतात. याच्या उलट हिंदू हे धर्म विसरल्यामुळे त्यांना काडी इतकीही किंमत (शक्ती) नाही.’

नाम घेतले की, भगवंत त्यामागे येतो !

आपण भगवंताशी काही ना काही कारणाने संबंध ठेवावा. त्याच्याशी बोलावे, त्याचे नाम घ्यावे. नामासारखे दुसरे खरे साधन नाही. वासरू घेऊन गेल्यावर जशी गाय पाठीमागून आपोआप येते. त्याप्रमाणे नाम घेतले की, भगवंत त्यामागे येतो. एकदा त्याचे होऊन राहिले, म्हणजे तोच सर्व उपाय काढतो.

हिंदूंमध्ये धर्मप्रेम नसल्याचा हा आहे परिणाम !

‘मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्यात त्या त्या पंथियांची एकजूट असते. याउलट हिंदूंमध्ये तथाकथित बुद्धीप्रामाण्यवादी (धर्मद्रोही) धर्माविषयी विकल्प निर्माण करत असल्याने हिंदूंमध्ये धर्मप्रेम नाही. त्यामुळे त्यांची एकजूट नाही आणि ते इतर धर्मियांकडून प्रतिदिन मार खातात.’

थोर संत ज्ञानेश्वर यांचे माहात्म्य !

‘कुठे जात, धर्म, प्रांत इत्यादी पहाणारे संकुचित वृत्तीचे आजचे राजकीय पक्षांचे पुढारी, तर कुठे ‘विश्वची माझे घर ।’ म्हणणारे संत ज्ञानेश्वर !’

राजकारण्यांची मर्यादा जाणा !

‘देवस्थानांकडे आणि तीर्थक्षेत्री न बोलावता सहस्रो लोक येतात, तर राजकारण्यांना पैसे देऊन लोकांना सभेला बोलवावे लागते !’

बुद्धीप्रामाण्यवाद्यांचा अहंकार !

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांना अहंकार असल्याने त्यांना ईश्वराचा आशीर्वाद मिळत नाही.’ 

भक्तीयोग, ज्ञानयोग आणि कर्मयोग यांच्या परिभाषेतील भेद

भक्तीयोग, ज्ञानयोग आणि कर्मयोग यांच्या परिभाषेतील भेद

स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या शालेय शिक्षणाची दुरवस्था !

. . . मोगल आणि इंग्रज यांच्या भारतातील राज्याचा इतिहास शिकवतात; पण त्यातही ‘तशी स्थिती का आली आणि ती पुन्हा येऊ नये; म्हणून काय केले पाहिजे’, हे शिकवत नाहीत. स्वातंत्र्यापासून आतापर्यंतचे शासनकर्ते याला उत्तरदायी आहेत. हिंदु राष्ट्रातच ही चूक सुधारण्यात येईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले