म्हणे सर्वधर्मसमभाव !

‘बालवाडीतील मुलगा आणि पदव्युत्तर शिक्षण झालेला तरुण यांचे शिक्षण सारखेच आहे’, असे आपण म्हणत नाही. तशीच स्थिती इतर तथाकथित धर्म आणि हिंदु धर्म यांच्यात असतांना ‘सर्वधर्मसमभावा’चा घोष करणे, यासारखे दुसरे अज्ञान नाही. . . असे म्हणणार्‍या आंधळ्यासारखे ‘सर्वधर्मसमभावी’ झाले आहेत.’- सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

विविध विषयांतील तज्ञ आणि संत यांच्यातील भेद !

. . . परंतु अध्यात्मात संतांना इतरांचे आध्यात्मिक त्रास दूर केल्यावर आध्यात्मिक त्रास होत नाहीत. काही संतांना शारीरिक त्रास होत असले, तरी ते देहप्रारब्धानुसार असतात. त्याचा संतांवर परिणाम होत नाही !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘सनातन प्रभात’ने निर्माण केलेली धर्मशक्तीच हिंदु राष्ट्र स्थापन करील !

या २५ वर्षांच्या काळात ‘सनातन प्रभात’ने सतत शब्दसामर्थ्याने जात्यंध, समाजकंटक, देशद्रोही आणि धर्मद्वेष्टे यांच्याविरुद्ध वैचारिक लढा दिला. अधर्माचरण, अनैतिकता, भ्रष्टाचार आणि धर्मांधता या दुष्प्रवृत्तींविरुद्ध आवाज उठवला. अल्पावधीत हिंदु राष्ट्र-स्थापनेची देशभर चर्चा घडवणारे ते एकमेव नियतकालिक ठरले. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

खरे प्रदूषणनिवारण करायचे असेल, तर आधी मनातले प्रदूषण दूर करा !

. . . प्रदूषणाला कारणीभूत असलेल्या रज-तमप्रधान मनाला आणि बुद्धीला साधनेने सात्त्विक न बनवता, म्हणजे मुळावर उपाय न करता केलेले वरवरचे उपाय हास्यास्पद आहेत. क्षयरोग झालेल्याला क्षयरोगाची औषधे न देता केवळ त्याला येणार्‍या खोकल्यासाठी औषध देण्यासारखे आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

मुले असंस्कारी असल्याचा हा आहे परिणाम !

‘मातृदेवो भव। पितृदेवो भव।’ म्हणजे ‘आई आणि वडील यांना देव मानावे’, असे मुलांवर बालपणी संस्कार न करणार्‍या आई-वडिलांसंदर्भात मोठ्या झालेल्या मुलांची वृत्ती ‘गरज सरो वैद्य मरो।’ अशी होते. त्यामुळे ती आई-वडिलांना वृद्धाश्रमात ठेवतात, यात आश्‍चर्य ते काय ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

कुठे ३५०० वर्षांत निर्माण झालेले विविध पंथ, तर कुठे अनादि हिंदु धर्म !

गेल्या १४०० वर्षांपूर्वी या जगात एकही मुसलमान नव्हता, २१०० वर्षांपूर्वी या जगात एक ख्रिस्ती नव्हता, २८०० वर्षांपूर्वी या जगात एकही बौद्ध वा जैन नव्हता आणि ३५०० वर्षांपूर्वी या जगात एकही पारसी नव्हता; मग त्यापूर्वी या जगात कोण होते ? केवळ हिंदू होते. हिंदु धर्म हा अनादि आणि अनंत आहे आणि सर्वांचा मूळ धर्म हा हिंदूच आहे. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

देशाला विनाशाकडे घेऊन जाणारे व्यक्तिस्वातंत्र्यवाले !

‘व्यक्तीपेक्षा समाज आणि समाजापेक्षा राष्ट्र महत्त्वाचे आहे, हे न समजणारे व्यक्तीस्वातंत्र्यवाले देशाला विनाशाकडे नेत आहेत !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

साधनेत सर्वस्वाचा त्याग टप्प्याटप्प्याने करावा !

‘साधनेत आरंभीच सर्वस्वाचा, म्हणजेच तन, मन आणि धन यांचा १०० टक्के त्याग करता येत नाही. यासाठी त्यांपैकी एकेकाचा थोडा थोडा त्याग करावा, उदा. सेवा आणि नामजप यांचा कालावधी दर महिन्याला थोडा थोडा वाढवणे..

गुढीपाडव्यापासून व्यक्तीगत आणि सामाजिक जीवनात रामराज्य स्थापन करण्याचा संकल्प करा !

‘गुढीपाडवा अर्थात् युगादी तिथी, म्हणजे हिंदूंचा नूतन वर्षारंभदिन ! हिंदु धर्मात साडेतीन मुहूर्तांवर शुभ कृत्ये करण्याचा संकल्प केला जातो. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. अयोध्येत नुकतेच श्री रामलल्ला विराजमान झाल्यानंतर देशाला आध्यात्मिक अधिष्ठान प्राप्त झाले आहे. आता देशाला आवश्यकता आहे ती रामराज्याची ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

बुद्धीप्रामाण्यवाद्यांचा अहंकार जाणा !

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांना ‘मला सर्व कळते’, असा अहंकार असतो. त्यामुळे काही जाणून घ्यायची जिज्ञासा नसल्याने बुद्धीपलीकडील अध्यात्मशास्त्र त्यांना मुळीच ज्ञात नसते आणि तरीही ते अध्यात्मातील अधिकारी संतांवर टीका करतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले