सनातन प्रभात > Post Type > साधना > अनुभूती > यज्ञाचे थेट प्रक्षेपण पहात असलेल्या ठिकाणी यज्ञ प्रत्यक्ष चालू असल्याप्रमाणे यज्ञातील धुराचा सुगंध येणे आणि धुराचा लोटही सूक्ष्मातून दिसणे
यज्ञाचे थेट प्रक्षेपण पहात असलेल्या ठिकाणी यज्ञ प्रत्यक्ष चालू असल्याप्रमाणे यज्ञातील धुराचा सुगंध येणे आणि धुराचा लोटही सूक्ष्मातून दिसणे
‘१७.३.२०२३ या दिवशी सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात दक्षिणामूर्ती यज्ञ करण्यात आला होता. त्याचे थेट प्रक्षेपण पहाण्यासाठी मी सेवा करत असलेल्या कक्षेतून बाहेर येत असतांना मला तीव्रतेने हवनाच्या धुराचा सुगंध आला. ‘यज्ञाचे थेट प्रक्षेपण दाखवत असलेल्या ठिकाणीच यज्ञविधी चालू आहे’, असे मला क्षणभर जाणवले. यज्ञातून येणार्या धुराच्या तीव्र सुगंधासमवेत मला त्या धुराचा लोटही सूक्ष्मातून दिसत होता.’
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक