‘फेब्रुवारी २०२५ मध्ये एका साधकाच्या मुलीचा विवाह सोहळा होता. त्या साधकाने ‘विवाह सोहळ्यात अध्यात्मप्रसार व्हावा’, या उद्देशाने मंगल कार्यालयातील सभागृहात एका भिंतीच्या कडेला सनातन संस्थेच्या विविध विषयांवरील धर्मशिक्षणाची माहिती असलेले फ्लेक्स प्रदर्शन लावले होते. विवाहासाठी अनेक जण आले होते आणि ते लोक एकमेकांशी बोलण्यात मग्न होते. ते पाहून माझ्या मनात विचार आले, ‘धर्मशिक्षणाचे फ्लेक्स कुणी वाचतील का ? याचा काही उपयोग होईल का ?’ त्यानंतर पुढील प्रसंग घडले.

१. नातेवाइकांनी व्यक्त केलेले मनोगत
विवाह सोहळा संपल्यानंतर त्या साधकाचे दोन नातेवाईक माझ्याकडे आले आणि मला म्हणाले, ‘‘संस्थेचे सर्व फ्लेक्स आम्ही वाचले. आम्हाला धर्माविषयी चांगली माहिती मिळाली. हे ज्ञान सर्वांपर्यंत पोचणे महत्त्वाचे आहे.’’
२. साधकाच्या नातेवाइकांना फ्लेक्सवरील सर्व लिखाण आवडणे आणि ते लिखाण अन्य लोकांपर्यंत पोचवण्याची त्यांची इच्छा असणे
फ्लेक्स प्रदर्शन आयोजित करणारा साधक मला म्हणाला, ‘‘आमचे एक दूरचे नातेवाईक सनातनचे पूर्वीपासून विरोधक आहेत. ते विरोधक गावात प्रतिष्ठित असून त्यांची स्वतःची खासगी शाळा आहे. ते आमचे नातेवाईक असल्यामुळे मी त्यांना विवाहासाठी निमंत्रित केले. त्या नातेवाइकांनी संस्थेच्या वतीने लावलेले सर्व फ्लेक्स वाचले. त्यांना ते पुष्कळ आवडले आणि त्यांनी फ्लेक्समधील धर्मशिक्षणाविषयीचे लिखाण माझ्याकडे मागितले आहे. ते मला म्हणाले, ‘‘ज्यांना या विषयाची आवड आहे. त्यांच्यापर्यंत मी तुमचा विषय पोचवतो.’’ यासाठी त्यांनी माझा पाठपुरावाही केला. माझ्यासाठी ही अनुभूतीच आहे.’’
३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संकल्प आणि धर्मशिक्षण फ्लेक्समधील ज्ञान अन् चैतन्य यांमुळे त्यातून ईश्वराला अपेक्षित धर्मकार्य घडणे
वरील सर्व विषय समजल्यावर माझ्या मनात विचार आले, ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा धर्मशिक्षण फ्लेक्सद्वारे समाजात अध्यात्मप्रसार करण्याचा संकल्प आहे. तसेच धर्मशिक्षण फ्लेक्समधील ज्ञान आणि चैतन्य यांमुळे त्यातून ईश्वराला अपेक्षित असे धर्मकार्य घडत असते. त्यामुळे मनात कुठलीही शंका न ठेवता किंवा फळाची अपेक्षा न करता अध्यात्मप्रसाराची सेवा मनोभावे करायला हवी.’
– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.३.२०२५)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |