ठाणे जिल्ह्यात अंगणवाडी सेविकांकडून घरपोच पोषण आहाराचे वाटप

कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये; म्हणून शाळा-महाविद्यालयांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या सध्या बंद आहेत. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस संबंधित गावांमध्ये घरोघरी जाऊन सेवा देत आहेत.

यवतमाळ जिल्ह्यात अवैध मद्यविक्री करणार्‍या १४७ जणांवर गुन्हा नोंद

२१ आणि २२ मार्च या काळात अवैध मद्यविक्री करणार्‍या १४७ जणांवर अवधूतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. वरील दोन्ही दिवशी ९ लाख ४८ सहस्र ३७४ रुपयांचा मद्यसाठा जप्त केला आहे.

श्री दासबोध नित्यपाठ म्हणजे श्री समर्थ उपदेशाचे जणू नवनीतच ! – रमणलाल शहा, ज्येष्ठ ज्योतिर्विद

श्री समर्थ रामदासस्वामी यांनी १७ व्या शतकात ‘ग्रंथराज दासबोध’ची निर्मिती केली. या ग्रंथाच्या माध्यमातून श्री समर्थांनी कालातीत असलेला पारमार्थिक आणि प्रापंचिक उपदेश केला आहे. आताच नाही भविष्यातही शेकडो वर्षे दासबोध ग्रंथोपदेश साधकांना मार्गदर्शक ठरणार आहे.

ठाणे, कल्याण आणि डोंबिवली येथे भाज्यांच्या दरात कमालीची वाढ

ठाणे, कल्याण आणि डोंबिवली पश्‍चिम येथील गुप्ते रस्ता, नवापाडा, सम्राट चौक रोड, उमेशनगर येथे भरवण्यात येणार्‍या बाजारात भाजीपाला आणि फळे यांच्या मूल्यात विक्रेत्यांनी दुपटीने वाढ केली आहे.

… अन्यथा गंभीर पाऊल उचलावे लागेल ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

थोडा विलंब झाला आहे; मात्र शासनाने योग्य पाऊल उचलले आहे. आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद करण्यात आली आहे. त्यासह देशांतर्गत चालू असलेली विमानसेवाही बंद करण्यात यावी, याविषयी माझे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणे झाले आहे.

प्रवासी हंगामात खासगी वाहतूकदारांकडून प्रवाशांची केली जाणारी लूटमार तात्काळ थांबवावी !

उन्हाळी सुट्टी, तसेच लग्नसराई यांच्या निमित्ताने चालू होणार्‍या प्रवासी हंगामात खासगी वाहतूकदारांकडून प्रचंड भाडेवाढ करून प्रवाशांची लूटमार केली जाते. ही लूटमार रोखण्यासाठी शासनाच्या निर्णयात सुधारणा करून त्याची प्रवासी हंगाम चालू होण्यापूर्वी परिणामकारक आणि कठोर कार्यवाही करावी

जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्व दुकाने ३१ मार्चपर्यंत बंद

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कल्याण – डोंबिवलीतील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सोडून सर्व दुकाने ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेतली आहे.

‘अर्थसंकल्प २०२०-२१’ मधील भरीव तरतुदी आणि काही उपेक्षित घटक !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने वर्ष २०२०-२१ चा पहिला अर्थसंकल्प सादर केला. अर्थमंत्री अजित पवार यांनी वर्ष २०२०-२१ चा ९ सहस्र ५११ कोटी रुपयांचा महसुली तुटीचा अर्थसंकल्प विधीमंडळात मांडला. सहस्रावधी रुपयांची तूट भरून काढण्याच्या दृष्टीने जमा आणि व्यय यांचा ताळमेळ घालण्याचा सरकारने प्रयत्न केला आहे….

‘अपनी पार्टी’ परकीच !

काश्मीरमध्ये ‘जम्मू-काश्मीर अपनी पार्टी’ नावाचा नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्यात आला आहे. ‘पीपल्स डेमोक्रॅटिक पक्ष’ म्हणजे ‘पीडीपी’त पूर्वी कार्यरत असलेले तत्कालीन अर्थमंत्री सईद अल्ताफ बुखारी यांनी हा पक्ष स्थापन केला आहे.

 हे केरळ उच्च न्यायालयाला का सांगावे लागते ? सरकारला स्वतःला कळत नाही का ?

‘केरळ उच्च न्यायालयाने देहलीतील हिंसाचाराच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात शाळा आणि महाविद्यालये यांच्या परिसरात कोणत्याही प्रकारच्या आंदोलनांवर बंदी घालण्याचा आदेश दिला आहे.