यवतमाळ जिल्ह्यात अवैध मद्यविक्री करणार्‍या १४७ जणांवर गुन्हा नोंद

२१ मार्च आणि ‘जनता कर्फ्यू’च्या काळात अवैध मद्यविक्री

यवतमाळ, २४ मार्च (वार्ता.) – २१ आणि २२ मार्च या काळात अवैध मद्यविक्री करणार्‍या १४७ जणांवर अवधूतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. वरील दोन्ही दिवशी ९ लाख ४८ सहस्र ३७४ रुपयांचा मद्यसाठा जप्त केला आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकार्‍यांनी १८ मार्चपासून जिल्ह्यात मद्यविक्री बंद करण्याचे आदेश दिले होते.