ठाणे जिल्ह्यात अंगणवाडी सेविकांकडून घरपोच पोषण आहाराचे वाटप

ठाणे – कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये; म्हणून शाळा-महाविद्यालयांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या सध्या बंद आहेत. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस संबंधित गावांमध्ये घरोघरी जाऊन सेवा देत आहेत. अंगणवाडी सेविकांकडून मुलांना सुका खाऊ देण्यासह आदिवासी विभागांतील गावांमध्ये गरोदर आणि स्तनदा मातांना ‘एपीजे अब्दुल कलाम पोषण आहार योजने’तून सकस आहार दिला जात आहे. यासह सेविका कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणकोणती काळजी घ्यावी ?, याविषयी लोकांना माहिती देत आहेत. ‘अंगणवाडी सेविकांनी स्वतःची पडताळणी करून मगच समाजात फिरावे’, अशा प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहेत.