‘दिवाण हाऊसिंग फायनान्स’ची १ सहस्र ५७ कोटी रुपयांची फसवणूक !

दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडची (डी.एच्.एफ.एल्.) १ सहस्र ५७ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने ४ बांधकाम व्यावसायिक आस्थापने आणि त्यांचे संचालक यांसह ९ जणांविरोधात निर्मलनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.

मराठवाडा येथे तरुणांशी विवाह केल्यानंतर पत्नी दागिन्यांसह पळून जाण्याच्या १५ दिवसांत ४ घटना !

तरुणांशी विवाह करून फसवणूक करणाऱ्या टोळीने गेल्या काही वर्षांत अनेक कुटुंबांना गंडा घातला आहे. मराठवाड्यातील जालना, बीड, खुलताबाद आणि संभाजीनगर या ठिकाणी ४ घटना घडल्याने ‘लुटेरी दुल्हन’चा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे.

महासांगवी (जिल्हा बीड) येथील मठाधिपती राधाताई महाराज यांना ‘साई सेवा गौरव’ पुरस्कार !

‘श्री साईबाबा चॅरिटेबल ट्रस्ट साईनगरी’, चंदननगर, पुणे यांच्या वतीने दिला जाणारा ‘साई सेवा गौरव’ पुरस्कार श्रीक्षेत्र संत मीराबाई आईसाहेब संस्थान महासांगवी (तालुका पाटोदा, जिल्हा बीड) येथील मठाधिपती महंत राधाताई महाराज सानप यांना प्रदान करण्यात आला.

वारकऱ्यांची गैरसोय टाळा !

चैत्र वारीला एवढ्या मोठ्या प्रमाणात भाविकांची उपस्थिती असेल, याचा कदाचित् विचारच न झाल्याने ‘श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती’ आणि प्रशासन यांच्या नियोजनाचा अभाव नेहमीप्रमाणे दिसून आला.

अकोला येथील श्रीरामभक्त रजनीकांत कडू यांनी १ कोटी ६८ लाख वेळा लिहून केला ‘श्रीरामा’चा नामजप !

संतांनी प्रवचनात सांगितल्याप्रमाणे नामजप लिहिण्याचा श्री. रजनीकांत कडू यांचा आदर्श इतर भक्तांनी घ्यावा !

अशा घटना हिंदु राष्ट्र अपरिहार्य करतात !

हनुमान जयंतीच्या मिरवणुकांवर उत्तराखंड, देहली आणि आंध्रप्रदेश या ३ राज्यांत धर्मांधांनी आक्रमण केले, तर कर्नाटकात सामाजिक माध्यमांतून आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित करण्यावरून धर्मांधांनी हनुमान मंदिराची तोडफोड केली.

पर्यावरणाच्या संरक्षणाविषयी धर्मग्रंथांमध्ये सांगितलेले सूत्र

१०० वर्षांपर्यंत जीवित रहाण्याच्या इच्छेसहित कर्म करा; परंतु परमात्म्याने निर्माण केलेले सृष्टीचक्र चालवण्यासाठी आपल्या वाट्याला आलेल्या कर्तव्याच्या रूपात करा. लालसेच्या (गिद्ध) दृष्टीने करू नका. असा निरापद, स्वास्थ्य संवर्धक पर्यावरण आणि विश्वात शांतीचा संदेश देणारे ‘वेद’ भगवंतच आहेत.’

ब्रह्मलोक आणि सूर्यमंडल यांच्या प्रकाशित भारतात गंगा, यमुना अन् सरस्वती या जलस्रोतांना आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक महत्त्व प्राप्त असणे

आध्यात्मिक स्तरावर ज्याप्रमाणे मानव देहातील इडा, पिंगला आणि सुषुम्ना या नाड्यांना सर्वाेत्तम महत्त्व आहे, तसेच या धरणीला या तीन जलस्रोतांचे महत्त्व आहे. आधिदैविक दृष्टीने ब्रह्मा, विष्णु आणि महेश या संज्ञेला महत्त्व आहे, तेच जल (सोम), सूर्य आणि अग्नी असे या जलस्रोतांना महत्त्व आहे.