रमजान ईदनिमित्त मीरारोड पोलिसांकडून इफ्तार पार्टी !

या पार्टीला स्थानिक मशीद आणि मदरसे यांतील मौलाना, स्थानिक मुसलमान यांसह मीरारोड, वसई, विरार येथील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

राज्यात वाहनांच्या वायूप्रदूषण चाचणीच्या दरांत वाढ !

वाहनांची वायूप्रदूषण पडताळणी करून वायूप्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (पोल्युशन टेस्ट सर्टिफिकेट (पीयूसी)) मिळवणे आता महाग होणार आहे. या चाचणीच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतल्याचे परिवहन विभागाने सांगितले.

चाळीसगाव (जिल्हा जळगाव) येथे पोलीस निरीक्षक के.के. पाटील यांनी कीर्तन बंद पाडले !

कीर्तन बंद पाडायला हा देश भारत आहे कि पाकिस्तान ? असा प्रकार करण्याचे धाडस पोलिसांनी अन्य धर्मियांच्या कार्यक्रमांच्या वेळी दाखवले असते का ?

माझ्यावरील आक्रमणाची ‘सी.बी.आय्’द्वारे चौकशी व्हावी !

स्वत:वर झालेल्या आक्रमणाची केंद्रीय अन्वेषण विभागाकडून चौकशी व्हावी, यासाठी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी २८ एप्रिल या दिवशी मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली आहे. याचिकेत शिवसैनिकांनी आक्रमण केल्याचे सोमय्या यांनी नमूद केले आहे.

३० एप्रिलला मुंबई-गोवा महामार्गावर ‘रास्ता रोको’ आंदोलन !

अपुऱ्या कामांच्या पार्श्वभूमीवर महाड (जिल्हा रायगड) येथील ‘पूर निवारण समिती’चा निर्णय !

मंत्रीमंडळाच्या बैठकीत पेट्रोलच्या किमती अल्प करण्याची चर्चा नाही ! – बाळासाहेब थोरात, मंत्री

मंत्रीमंडळाच्या बैठकीत पेट्रोलच्या किमती अल्प करण्याविषयी कोणतीही चर्चा झाली नाही, अशी माहिती राज्याचे मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. राज्यातील पेट्रोलवरील कर अल्प करून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून केला जाणार असल्याची चर्चा होती; मात्र प्रत्यक्षात यावर कोणतीही चर्चा झाली नाही.

चंद्रपूर येथील काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांच्या घरी चोरी !

खासदारांच्या घरी चोरी होते, तेथे सर्वसामान्यांच्या सुरक्षेचा विचारच न केलेला बरा !

किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांना १४ जूनपर्यंत अटकेपासून दिलासा !

भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नगरसेवक नील सोमय्या यांना मुंबई उच्च न्यायालयाने अटकेपासून दिलेला अंतरिम दिलासा १४ जूनपर्यंत कायम ठेवला आहे.

बुलढाणा येथे समृद्धी महामार्गावर उभारण्यात येत असलेल्या पुलाचा मोठा भाग कोसळला !

समृद्धी महामार्गावर उभारण्यात येत असलेल्या पुलाचा मोठा भाग २७ एप्रिलच्या रात्री १ ते २ च्या दरम्यान कोसळला. एक मोठा गर्डर ८० फुटांवरून खाली कोसळला. काम चालू असतांना कामगार तेथून बाजूला गेल्यानंतर ही घटना घडली.

हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी ‘शिवशक्ती महायज्ञ’ पार पडला !

हिंदू एकता आंदोलन संघटनेच्या वतीने पारंपरिक शिवजयंतीच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यातील एक कार्यक्रम म्हणून बलशाली हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी २७ एप्रिल या दिवशी कृष्णामाई घाट, प्रीतीसंगम या ठिकाणी ‘शिवशक्ती महायज्ञा’चे आयोजन करण्यात आले होते.