
‘मी साधनेला प्रारंभ केल्यावर मला सूक्ष्मातून मिळणार्या ज्ञानावर अधिक भर देत होतो. त्या ज्ञानाच्या आधारे माझे काही ग्रंथही प्रकाशित झाले. आता मी अध्यात्मशास्त्राच्या संदर्भात इतरांनी लिहिलेल्या ग्रंथातील लिखाण निवडायला प्राधान्य देत आहे; कारण त्यात स्वतःला मिळणार्या ज्ञानाच्या तुलनेत अधिक प्रमाणात ज्ञान मिळत आहे. ईश्वराकडून ज्ञान मिळण्याचे माध्यम पालटले असले, तरी दोन्ही माध्यमांतून ज्ञानच मिळत असल्यामुळे त्यामध्ये कोणताही कमीपणा वाटत नाही. उलट नवीन काहीतरी शिकण्याचा आनंद अधिक मिळत आहे.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले