केवळ गोरगरीब नव्हे, तर कुणाकडूनही शासकीय रुग्णालयांत पैसे घेऊ नये !

‘गोरगरिबांच्या सेवेसाठी शासकीय रुग्णालये आहेत. त्यामुळे शासकीय रुग्णालयात कुठल्याही गरीब व्यक्तीकडून पैसे घेण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातील डॉक्टरांनी करू नये. तसे झाल्यास त्याचे वाईट परिणाम होतील, अशी चेतावणी भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी दिली आहे.’

हिंदूंमध्ये केवळ अस्तित्व आणि जाणीव उरली आहे; पण जागृती नसल्याने हिंदु धर्मावर निरंतर आक्रमणे होत आहेत

‘हिंदूंमध्ये केवळ अस्तित्व आणि जाणीव उरली आहे; पण जागृती नसल्याने हिंदु धर्मावर निरंतर आक्रमणे होत आहेत.’

मंदिरांच्या मर्यादेचे रक्षण करणारा देव !

देवदर्शनाकरता व्याकुळलेल्या चोखोबा भक्ताच्या भेटीला पांडुरंगच स्वतः मंदिराबाहेर येतात. शास्त्रविधीनुसार मंदिर मर्यादेच देव स्वतःच रक्षण करतात.

पंढरपूरला आद्य शंकराचार्यांनी ‘महायोगपीठ’ म्हणण्याचे कारण

तीर्थक्षेत्री भक्त देवाच्या किंवा शक्तीपिठावर देवीच्या दर्शनासाठी जात असतात; मात्र पंढरपूरला पांडुरंग भक्त पुंडलिकाची वाट पहात तिष्ठत उभा आहे. परमेश्‍वर भक्ताची वाट पहात आहे; म्हणून हे महायोगपीठ आहे.’

पाश्‍चात्त्यांची क्षणभंगूर टिकणारी मानसिकता !

हे पाश्‍चात्य मूर्ख, दोन दिवस ही एखादी धारणा आदर्श अशी धरून ठेवू शकत नाहीत. परस्परांची हजामत करतात आणि सोडून देतात. एखाद्या पतंगासारखे यांचे भंगूर जीवन ! यांचे सिद्धांत बुडबुड्यासारखे उत्पन्न होतात आणि बुडबुड्यात त्यांचा लय होतो . . . तोपर्यंत आम्ही तुम्हाला टारगट पोरच समजू. – गुरुदेव डॉ. काटेस्वामी

धर्मांतराची समस्या रोखण्यासाठी स्वयंसेवी संस्थांना विदेशातून मिळणारा पैसा रोखायला हवा !

‘ख्रिस्ती धर्माच्या प्रसारासाठी २३ सहस्र १३७ स्वयंसेवी संस्था कार्यरत असून त्यांना १५ सहस्र २०९ कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य केले जाते. विदेशातून हा पैसा उपलब्ध होतो. या स्वयंसेवी संस्था यातील १० टक्के रक्कम स्वतःसाठी तर ९० टक्के  रक्कम चर्चसाठी वापरतात.

नास्तिकपणामुळे झालेली हानी !

आज नास्तिकपणाचा स्वैर संचार चालू आहे. व्यक्ती, समाज, देश, धर्म, स्वार्थ, ईश्‍वर, उन्नती, आचार-विचार यांचा परस्परांशी काही संबंध राहिला नाही.

मानवातील जीवनाचे महत्त्व

मानवी जीवन हे अनेकानेक लक्षावधी वर्षांच्या उत्क्रांतीनंतर प्राप्त होत असते. आपण असे लक्षात ठेवले पाहिजे की, पद्मपुराणात म्हटल्याप्रमाणे जीवयोनींची संख्या ८४ लाख आहे.

समाजकंटकांचे सनातन आश्रमावरील आक्रमणांचे घृणास्पद कृत्य चालूच !

शिवीगाळ करणे, धमक्या देणे, अश्‍लील बोलणे आणि दगडफेक करणे या गोष्टी दखलपात्र ठरवणारे दंडविधान हिंदु राष्ट्रात असेल !

वैदिक संस्कृतीचा द्वेष आणि तिला नामशेष करण्याचे षड्यंत्र !

वैदिक संस्कृतीतील कोणतेही चिन्ह, वस्तू, वेशभूषा, आहार-विहार आमच्या मुलांना दिसता कामा नये. त्यांना हेच ख्रिश्‍चन वळण लागावे, अशी उत्कटता आहे . . . आम्ही वैदिक संस्कृतीच्या हवेत श्‍वास घ्यावा, ही उत्कटता असतांना कडव्या वैदिकाला धर्मजीवनही जगता येणे अशक्य झाले आहे. – गुरुदेव डॉ. काटेस्वामी