ब्रिटनचे पंतप्रधान श्रीरामाचे नाव घेऊन शुभेच्छा संदेश पाठवतात. एकातरी भारतीय राजकीय पक्षाचे नेते देवाचे नाव घेऊन संदेश पाठवतात का ?

ज्याप्रमाणे भगवान श्रीराम राक्षसराज रावणाला पराभूत करून पत्नी सीता यांच्या समवेत अयोध्येला परतले आणि लाखो दिवे लावून त्यांचे स्वागत करण्यात आले, त्याचप्रमाणे आपणही या दीपावलीला कोरोनाच्या विरोधात विजय मिळवू

राष्ट्राच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात गाजलेल्या पुणे शहराला हे लज्जास्पद !

पुणे महानगरपालिका पर्यावरण रक्षणाच्या गोंडस नावाखाली सातत्याने काही ना काही धर्मद्रोही उपक्रम राबवत आहे. आता तर धर्मद्रोहाची परिसीमा गाठत विसर्जनासाठी दान म्हणून घेतलेल्या श्री गणेशमूर्तींची पुनर्विक्री करत असल्याचे उघड झाले आहे !

वक्त्याचे बोलणे आत्मविश्‍वासपूर्वक असण्याचे महत्त्व

‘संवादातून सुसंवाद साधण्याच्या हातोटीवर पुष्कळ लोकांनी जीवनात यश मिळवले आहे. अनेकांना विषयाचे भरपूर ज्ञान असूनही इतरांवर तेवढा प्रभाव पाडता येत नाही. उलट अधिक ज्ञान नसूनही काही लोक उत्तम प्रभाव पाडू शकतात.

केवळ गोरगरीब नव्हे, तर कुणाकडूनही शासकीय रुग्णालयांत पैसे घेऊ नये !

‘गोरगरिबांच्या सेवेसाठी शासकीय रुग्णालये आहेत. त्यामुळे शासकीय रुग्णालयात कुठल्याही गरीब व्यक्तीकडून पैसे घेण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातील डॉक्टरांनी करू नये. तसे झाल्यास त्याचे वाईट परिणाम होतील, अशी चेतावणी भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी दिली आहे.’

हिंदूंमध्ये केवळ अस्तित्व आणि जाणीव उरली आहे; पण जागृती नसल्याने हिंदु धर्मावर निरंतर आक्रमणे होत आहेत

‘हिंदूंमध्ये केवळ अस्तित्व आणि जाणीव उरली आहे; पण जागृती नसल्याने हिंदु धर्मावर निरंतर आक्रमणे होत आहेत.’

मंदिरांच्या मर्यादेचे रक्षण करणारा देव !

देवदर्शनाकरता व्याकुळलेल्या चोखोबा भक्ताच्या भेटीला पांडुरंगच स्वतः मंदिराबाहेर येतात. शास्त्रविधीनुसार मंदिर मर्यादेच देव स्वतःच रक्षण करतात.

पंढरपूरला आद्य शंकराचार्यांनी ‘महायोगपीठ’ म्हणण्याचे कारण

तीर्थक्षेत्री भक्त देवाच्या किंवा शक्तीपिठावर देवीच्या दर्शनासाठी जात असतात; मात्र पंढरपूरला पांडुरंग भक्त पुंडलिकाची वाट पहात तिष्ठत उभा आहे. परमेश्‍वर भक्ताची वाट पहात आहे; म्हणून हे महायोगपीठ आहे.’

पाश्‍चात्त्यांची क्षणभंगूर टिकणारी मानसिकता !

हे पाश्‍चात्य मूर्ख, दोन दिवस ही एखादी धारणा आदर्श अशी धरून ठेवू शकत नाहीत. परस्परांची हजामत करतात आणि सोडून देतात. एखाद्या पतंगासारखे यांचे भंगूर जीवन ! यांचे सिद्धांत बुडबुड्यासारखे उत्पन्न होतात आणि बुडबुड्यात त्यांचा लय होतो . . . तोपर्यंत आम्ही तुम्हाला टारगट पोरच समजू. – गुरुदेव डॉ. काटेस्वामी

धर्मांतराची समस्या रोखण्यासाठी स्वयंसेवी संस्थांना विदेशातून मिळणारा पैसा रोखायला हवा !

‘ख्रिस्ती धर्माच्या प्रसारासाठी २३ सहस्र १३७ स्वयंसेवी संस्था कार्यरत असून त्यांना १५ सहस्र २०९ कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य केले जाते. विदेशातून हा पैसा उपलब्ध होतो. या स्वयंसेवी संस्था यातील १० टक्के रक्कम स्वतःसाठी तर ९० टक्के  रक्कम चर्चसाठी वापरतात.

नास्तिकपणामुळे झालेली हानी !

आज नास्तिकपणाचा स्वैर संचार चालू आहे. व्यक्ती, समाज, देश, धर्म, स्वार्थ, ईश्‍वर, उन्नती, आचार-विचार यांचा परस्परांशी काही संबंध राहिला नाही.